नव्या कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकरी सध्या आंदोलन करत आहेत. जोपर्यंत हे कायदे रद्द केले जाणार नाहीत तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही असा इशारा त्यांनी केंद्र सरकारला दिला आहे. दरम्यान आंदोलन करणारे शेतकरी पिझ्झा खात असतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. हे फोटो पाहून काही नेटकरी संतापले अन् त्यांनी आंदोलनकर्त्यांवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली. या टीकाकारांना आता अभिनेत्री स्वरा भास्कर हिने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. जे शेतकरी गहूची शेती करतात ते गहूपासून तयार झालेला पिझ्झा खाऊ शकत नाही का? असा सवाल तिने विरोधकांना केला आहे.

अवश्य पाहा – आई म्हणणाऱ्या विद्यार्थ्याला सनी लिओनीचं प्रत्युत्तर; म्हणाली, हा मुलगा तर…

“जे शेतकरी गहूची शेती करतात ते गहूपासून तयार झालेला पिझ्झा खाऊ शकत नाही का? त्यांचे पाय मेहनतीचे प्रतिक आहेत. त्यांच्या मेहनतीमुळेच देशातील जमीन सुपीक बनते. यांना देखील पायांचा मसाज करण्याचा अधिकार आहे. कोण आहेत ते ज्यांना शेतकऱ्यांना कायम दरिद्री आणि लाचार परिस्थितीतच पाहायचं आहे?” अशा आशयाचं ट्विट करुन स्वराने ट्रोलर्सला रोखठोक प्रत्युत्तर दिलं आहे. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – ‘अशी लोकच हिंसेला प्रोत्साहन देतात’; योगराज सिंग यांच्या भाषणावर दिग्दर्शक संतापला

शेतकरी आंदोलन आणखी पेटणार!

केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेले शेतकरी आंदोलन आता अधिकच तीव्र होत आहे. आज आंदोलनाचा १७ दिवस होता मात्र अद्यापही यावर तोडगा निघाला नसल्याने, शेतकरी संघटना आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. एवढच नाहीतर आता आंदोलनाचे स्वरूप आणखी तीव्र करण्याचा इशाराही एकप्रकारे देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आता सर्व शेतकरी संघटनांचे नेते १४ डिसेंबर रोजी एकाच व्यासपीठावर उपोषणास बसणार असल्याचे आज संयुक्त किसान आंदोलनचे नेते कमलप्रीत सिंह पन्नू यांनी सांगितले आहे.