बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि तिच्या चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असते. स्वरा सोशल मीडियार सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. आता स्वराने नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो स्वराच्या गृहप्रवेश पूजेचे आहेत. दरम्यान, हे फोटो पाहिल्यानंतर स्वराला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे.

स्वराने २०१९ मध्ये तिच्या घराच्या दुरुस्तीकरणाचे काम सुरु केले होते. आता या घराचे काम झाले आहे. तर अवघ्या दीड वर्षानंतर स्वरा तिच्या घरी परतली आहे. जुन्या घरात एक नवीन सुरुवात करण्यासाठी स्वराने गृहप्रवेशाची पूजा ठेवली होती आणि त्याचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Swara Bhasker (@reallyswara)

आणखी वाचा : अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेतील हेड कॉन्स्टेबलची बदली; वर्षाला घेत होता दीड कोटी पगार

स्वराने हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. एका फोटोत स्वराच्या डोक्यावर कलश असल्याचे दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत ती हवन समोर असल्याचे दिसत आहे. हे फोटो शेअर करत ‘देवाने मान्यता दिली’, असे कॅप्शन स्वराने दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Swara Bhasker (@reallyswara)

आणखी वाचा : KBC 13 ला मिळाली पहिली करोडपती, दृष्टीहीन हिमानी बुंदेलने रचला इतिहास

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
swara bhaskar, swara bhaskar trolled,
स्वराच्या पोस्टवर कमेंट करत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.

स्वराच्या गृहप्रवेशचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. एक नेटकरी म्हणाला, ‘मौलवी साहेब आले पाहिजे होते.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘नमाजाची वेळ.’ तिसरा नेटकरी म्हणला, ‘हिंदू पूजा करू नको.’ आणखी एक नेटकरी म्हणाला, ‘ढोंगीपणा पासून वाचा, सावधान रहा आणि सावधगिरी बाळगा.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘मला वाटलं तू नास्तिक आणि डाव्या विचारसरणीची आहेस’, अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी स्वराला ट्रोल केले आहे.