झी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेने आजवर संभाजी महाराजांच्या जीवनावरील महत्त्वाच्या घडामोडींसोबतच बारीकसारीक प्रसंगांवरही प्रकाश टाकत खरा इतिहास सादर करण्याचं काम केलं आहे. यात काही नावीन्यपूर्ण वाटाव्यात अशा घटनांचा उलगडाही प्रेक्षकांना होतो आहे. यात आता संभाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वाचं समजल्या जाणाऱ्या एका प्रकरणाचा छडा लवकरच लागणार आहे. हे प्रकरण आहे संभाजीराजे आणि दिलेर खान..

संभाजी महाराजांचं दिलेर खानकडे जाणं याबाबत इतिहासकारांनी अनेक मतमतांतरं मांडली आहेत. वेगवेगळ्या नाटक, कादंबऱ्यांमधून वेगवेगळं चित्र रंगवण्यात आलं आहे. अनेकांना वाटतं की शिवाजी महाराजांवर चिडून संभाजीराजे गेले होते. काहींनी लिहिलंय की स्वत:चं कर्तृत्व सिद्ध करायला गेले. एकूण संभाजीराजांचं बंड अशा पद्धतीने या घटनेकडे पाहिलं गेलं आहे. यामुळे त्यावेळी नेमकं काय घडलं याबाबत विविध विचार आहेत. असं असताना ‘स्वराज्यरक्षक संभाजी’मध्ये काय दाखवलं जाणार याबाबत उत्सुकता वाढणं साहजिक आहे.
आता ‘स्वराज्यरक्षक संभाजी’मध्ये काय पाहायला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहेच. या मालिकेत हे प्रकरण कशा पद्धतीने दाखवण्यात येईल हे पाहणं कुतूहलाचं ठरणार आहे.

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेने नेहमीच समज-गैरसमजांच्या पलीकडे जाऊन नि:पक्षपातीपणे खरा इतिहास दाखवला आहे. मग ते गोदावरीचं प्रकरण असो, वा कलावंतीणीचं गाणं ऐकण्याचं.. या सर्व गोष्टी मोठ्या शिताफीनं हाताळत खरा इतिहास मांडण्याचा प्रयत्न या मालिकेच्या माध्यमातून होतोय. ज्याला महाराष्ट्रातून सर्वमान्यता मिळतेय. भरभरून प्रेमही मिळतंय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता संभाजीराजे- दिलेर खान प्रकरण हा फार मोठा पेच मालिकेत आला आहे. हा पेच आता कसा सुटणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.