रामायण, महाभारत या ऐतिहासिक मालिका पुन्हा सुरू झाल्यानंतर आता प्रेक्षकांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. आता लॉकडाउनच्या काळात ही मालिका पुन्हा एकदा प्रसारित केली जाणार आहे.

येत्या ३० मार्चपासून ही मालिका पुन्हा सुरू होत आहे. ३० मार्च रोजी मालिकेचा पहिल्या दिवसाचा दोन तासांचा भाग प्रदर्शित होईल. दुपारी ४ वाजता ही मालिका प्रसारित होईल. त्यानंतर दररोज ४ ते ८ या वेळेत ही मालिका झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

Sambhaji Nagar Accident
“रील बनवताना मृत्यू नाही, माझ्या बहिणीची सुनियोजित हत्या”, बहिणीचा गंभीर दावा; म्हणाली, “३०-४० किमी लांब येऊन…”
chandrashekhar bawankule and jayant patil
“मला बावनकुळेंची काळजी वाटतेय”, फडणवीसांविषयी विचारल्यावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया चर्चेत; म्हणाले…
wardha lok sabha seat, Unsung Heroes Who Contributed to Amar Kale s Victory, amar kale victory, ncp sharad pawar, maha vikas aghadi, amar kale,
वर्धा : अमर काळे यांच्या विजयाचे पडद्यामागील ‘हे’ आहेत सूत्रधार
Shinde group displeasure over BJP interference
भाजपच्या हस्तक्षेपावर शिंदे गटाची नाराजी; निकालानंतर पक्ष नेते आक्रमक
Kisan Kathore, Bhiwandi,
भिवंडीत बाळ्यामामा म्हात्रेंच्या विजयापेक्षा किसन कथोरेंचीच चर्चा अधिक
Eknath Shinde position as chief minister in the state became stronger due to BJP influence
भाजपच्या पडझडीमुळे राज्यात एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद आणखी मजबूत झाले?
BJP, lok sabha 2024, nanded constituency, Ashok Chavan
अशोक चव्हाणांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह !
supreme court denied arvind kejriwal extension of interim bail
अन्वयार्थ : ‘विशेष वागणुकी’ला मुदतवाढ नाही!

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणून ओळखली जाते. या मालिकेत अभिनेता अमोल कोल्हे यांनी छत्रपती संभाजी महाराजांची व्यक्तिरेखा साकारली आहे. कमी कालावधीत लोकप्रिय झालेल्या या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवलं आहे.

या मालिकेतून संभाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडींवर, तसेच बारीकसारीक प्रसंगांवर प्रकाश टाकण्यात आला. डॉ. अमोल कोल्हे यांनी साकारलेली संभाजी यांची भूमिका, तसेच शंतनू मोघे यांनी साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका आणि प्राजक्ता गायकवाडने साकारलेली येसुबाईंची भूमिका यांनादेखील प्रेक्षकांचे तितकेच प्रेम मिळाले.

करोना विषाणूचा प्रसार रोखता यावा यासाठी देशभरात लॉकडाउन घोषित करण्यात आले आहे. लोकांनी घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं जात आहे. अनिश्चित काळासाठी सर्व शूटिंग रद्द केले गेले आहेत. अशा वेळी मनोरंजनासाठी जुन्या गाजलेल्या मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या जात आहेत. दूरदर्शनवर शनिवारपासून ‘रामायण’, ‘महाभारत’, ‘व्योमकेश बक्षी’ आणि ‘सर्कस’ या मालिका पुन्हा प्रसारित केल्या जात आहेत. त्यानंतर आता झी मराठी वाहिनीनेही ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही लोकप्रिय मालिका पुन्हा एकदा प्रसारित करण्याचा निर्णय घेतला आहे.