लॉकडाउनमुळे सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनाच त्यांच्या कुटुंबीयांसोबत मनमुराद वेळ घालवण्याची संधी मिळत आहे. मात्र या वेळेचाही सदुपयोग कसा करायचा याचं नियोजन अनेकजण करत आहेत. अभिनेता स्वप्निल जोशीनेही लॉकडाउनच्या काळात त्याच्या चार वर्षांच्या मुलीला एक खास गोष्ट शिकवण्याचा निर्धार केला आहे.

स्वप्निलने लहानपणीच अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. ‘रामायण’ या पौराणिक मालिकेत त्याने कुशची भूमिका साकारली होती. तेव्हा तो नऊ वर्षांचा होता. अभिनय क्षेत्रातील इतक्या वर्षांचा अनुभव तो आता मुलीला सांगत आहे. मायराला स्वप्निल लाइटिंग, कॅमेरा अँगल अशा छोट्या-मोठ्या गोष्टी आतापासूनच शिकवत आहे.

 

View this post on Instagram

 

#HappyBirthday #daughterlove #quarantinebirthday

A post shared by

याविषयी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत स्वप्नील म्हणाला, “माझ्या मुलीमध्ये अभिनयाची एक चुणूक आतापासूनच मला दिसते. माझ्याकडूनच तिला हा वारसा मिळाला आहे असं म्हणायला हरकत नाही. प्रतिभा जरी महत्त्वाची असली तरी सर्वसामान्य गोष्टी माहीत करून घेणंही गरजेचं आहे. त्यामुळे मी तिला या गोष्टी शिकवत आहे. कॅमेरा अँगल्स, लाइट्स या गोष्टींविषयी मी तिला नवनवीन पद्धतीने माहिती सांगतोय. माझ्यासाठीसुद्धा हा एक सराव आहे. मी ज्या लहानसहान गोष्टी शिकलो, त्या मायराला सांगताना माझासुद्धा नव्याने सराव होत आहे. आम्ही दोघं एकमेकांकडून खूप काही शिकतोय आणि शिकताना खूप मज्जा येतेय.”