अभिनेत्री तापसी पन्नू तिच्या बेधडक भूमिकांसोबतच सडेतोड वक्तव्यांसाठीही प्रसिद्ध आहे. ‘पिंक’, ‘बेबी’, ‘नाम शबाना’ या चित्रपटांमध्ये तिने ज्याप्रकारे धाडसी भूमिका साकारल्या. त्याचप्रकारे खऱ्या आयुष्यातही आपण हजरजबाबी, साहसी असल्याचं तापसीने सिद्ध केलं आहे. सोशल मीडियावर अश्लिल कमेंट करणाऱ्याला तिने सडेतोड उत्तर दिलं असून तिच्या उत्तरातील एक शब्द गुगलवर सर्वाधिक सर्च केलं गेलं.
‘मला तुझ्या शरीराचे अवयव आवडतात,’ अशी कमेंट एका ट्विटर युजरने तापसीला केली. त्यावर तापसीने रोखठोक उत्तर दिलं. ‘अरे वाह! मला पण आवडतात. पण तुम्हाला कोणता आवडतो, मला ‘सेरेब्रम’ आवडतो,’ असं उत्तर देत तापसीने त्या व्यक्तीचं तोंडच बंद केलं. तापसीने दिलेलं हे उत्तर चर्चेत आलं आणि तिच्या ट्विटमधील ‘सेरेब्रम’ म्हणजे काय असा प्रश्न अनेकांना पडला.
Wow! I like them too. BTW which is your favourite ? Mine is the cerebrum. https://t.co/3k8YDbAL64
— taapsee pannu (@taapsee) December 17, 2018
https://t.co/FPOJIfucbc
— taapsee pannu (@taapsee) December 18, 2018
वाचा : ‘झिरो’ फ्लॉप झाला तर पुढे काम मिळणं कठीण; शाहरुखला सतावतेय चिंता
‘सेरेब्रम’ म्हणजे मोठा मेंदू. हा शब्द त्यावेळी २४ तासांत गुगलवर सर्वाधिक सर्च केलं गेलं. एका नेटकऱ्याने गुगल सर्चचा स्क्रिनशॉट शेअर करत तापसीला टॅग केलं. नेटकऱ्यांनी तापसीच्या या उत्तराचं कौतुकसुद्धा केलं.