‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंय. या मालिकेतील प्रत्येक पात्राला चाहत्यांची कायम पसंती मिळताना दिसते. या शोमध्ये अगदी लहान लहान भूमिका साकारणाऱ्या कलाकारांनी देखील त्यांची खास ओळख निर्माण केलीय. यातीलच एक पात्र म्हणजे रीटा रिपोर्टर. या शोमध्ये रीटा रिपोर्टची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रिया अहुजा दिसायला खूपच सुंदर आहे. प्रिया सोशल मीडियावरदेखील चांगलीच सक्रिय असते.
‘तारक मेहता का उल्टा चष्माचे’ दिग्दर्शक मालव राजदा हे प्रियाचे खऱ्या आयुष्यातील पती आहेत. प्रिया अनेकदा पती मालव यांच्यासोबतही अनेक धमाल व्हिडीओ शेअर करत असते. नुकतेच प्रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. हे फोटो प्रियाचे पती मालव राजद यांनीच काढले आहेत. या फोटोंवर प्रियाच्या अनेक चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे. मात्र या फोटोत प्रियाच्या ब्राची पट्टी दिसत असल्याने काही नेटकऱ्यांनी तिच्यावर निशाणा साधला आहे. असं असलं तरी प्रियाच्या पतीने एका ट्रोलरची चांगलीच कान उडणी केलीय.
View this post on Instagram
प्रियाने शेअर केलेल्या फोटोंना तिने सुंदर कॅप्शनही दिलंय. “जे काही तुमच्या आत्म्याला समाधान देणार आहे ते करा” असं ती कॅप्शनमध्ये म्हणाली आहे. प्रियाच्या या फोटोंवर एका नेटकऱ्यांनी वाईट शब्दांत कमेंट केली आणि या कमेंटवर तिचा पती मालव राजद यांची नजर गेली. त्यानंतर मालव यांनी या नेटकऱ्यांची बोलती बंद केली. “हेच तुमच्या आई किंवा बहिणीला बोलून बघा, पहा त्यांची प्रतिक्रिया कशी येतेय” असं म्हणत या नेटकऱ्यांला त्यांनी चांगलंच सुनावलं. तर आणखी एका ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्याला ‘तारक मेहता..’च्या फॅन ग्रुपकडूनच सडेतोड उत्तर देण्यात आलंय.
एका नेटकऱ्यांने “मॅम तुमची ब्रा दिसतेय” अशी कमेंट केली होती. यावर इन्स्टाग्रामवरील एका फॅनपेजकडून उत्तर देण्यात आलंय. “आणि तुमचे खालच्या पातळीचे विचारही दिसतायत” अशा आशयाचं उत्तर देण्यात आलंय.

आई झाल्यानंतर देखील प्रिया ‘तारक मेहता…’शोच्या अनेक भागांमध्ये रीटा रिपोर्टच्या भूमिकेत झळकली आहे. सध्या ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ शोची टीम मुंबईत परतली आहे. मुंबईतील गोकुळधाम सोसायटीच्या सेटवर पुन्हा एकदा शूटिंग सुरु करण्यात आलंय.