छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत आहे. या शोमधील प्रत्येक पात्राला चाहत्यांची कायम पसंती मिळताना दिसते. खास करून शोमधील जेठालाल आणि बापूजीमधील तू तू मै मै प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत असते. या शोमध्ये बापूजीची भूमिका साकारणारे अभिनेते अमित भट्ट खऱ्या आयुष्यात मात्र फारच तरुण आहेत. चंपकलाल म्हणजेच बापूजी या भूमिकेसाठी ते मोठी मेहनत घेताना दिसतात. या भूमिकेसाठी अमित भट्ट यांना खऱ्या आयुष्यात अनेकदा टक्कल करावं लागलं आहे. यामुळे त्यांना काही अडचणींचा सामना देखील करावा लागला होता.

अनेक कलाकार आपल्या भूमिकेसाठी मोठी मेहनत घेताना दिसतात त्याच प्रमाणे अमित भट्ट यांनी देखील चंपकलाल गढा या त्यांच्या भूमिकेसाठी अनेकदा मुंडन करावं लागलं आहे. या भूमिकेसाठी अमित भट्ट यांनी जवळपास २८० वेळा टक्कल करावं लागलं आहे. या शोच्या सुरुवातीच्या भागांमध्ये बापूजी गांधी टोपी घालत नव्हते. आजही जुन्या एपिसोडमध्ये आपण हे पाहू शकतो. यासाठी शोच्या निर्मात्यांनी खास विग तयार करून घेतलं होतं. मात्र भूमिकेसाठी अमित भट्ट यांनी विगला नकार दिला. ते सीनच्या आधी प्रत्येक वेळी टक्कल करत. कॅमेरा समोर येण्यापूर्वी प्रत्येक वेळी डोक्यावर वस्तारा फिरल्याने अमित भट्ट यांना डोक्यावरील त्वचेवर अ‍ॅलर्जी देखील झाली होती.

हे देखील वाचा: शाहिद कपूरच्या लेकीचा स्टायलिश अंदाज, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

 

View this post on Instagram

 

A post shared by Amit Bhatt (@amitbhatt9507)

एका मुलाखतीत अमित भट्ट यांनी सीनसाठी ते दर दोन तीन दिवसांनी टक्कल करत असल्याचा खुलासा केला होता. मात्र त्वचेला अ‍ॅलर्जी झाल्याने अखेर डॉक्टरांनी त्यांना टक्कल न करण्याचा सल्ला दिला. यावर तोडगा काढण्यासाठी कालांतराने अमित भट्ट बापूजी या भूमिकेसाठी ‘गांधी टोपी’ घालू लागले.

हे देखील वाचा: “… एका मृत आत्म्यासह महासागरापलिकडे निघालेय”, देश सोडणाऱ्या अफगाणी निर्मातीची हृदयद्रावक पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Amit Bhatt (@amitbhatt9507)

जवळपास १३ वर्षापासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा शो प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. या शोमधील गोकुळधाम सोसायटीतील प्रत्येक कुटुंब चाहत्यांना आपलं कुटुंब वाटू लागलं आहे.