‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका गेल्या १३ वर्षांपासून आपले मनोरंजन करत आहे. मालिकेत असलेले जेठालाल, अय्यर, भिडे यांच्यात सुरु असणारे संवाद आणि त्यांच्या पंचलाइन या नेहमीच प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. मालिकेचे दिग्दर्शक मालव राजदा हे सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. मालव विनोदी फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतात. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतात. नुकताच त्यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी मालव यांना जेठालालची मदत घेण्याचा सल्ला दिला आहे.

मालव यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत मालव टॉयलेट सीटवर बसल्याचे दिसत आहे. त्यावेळी, ते उदित नारायण आणि मुखर्जी यांच ‘आखिर तुम्हें आना है’ हे गाणं गाताना दिसतं आहे. हा विनोदी व्हिडीओ शेअर करत प्रत्येक सकाळची कहाणी, अशा आशयाचे कॅप्शन त्यांनी दिले आहे.

आणखी वाचा : सीतेच्या भूमिकेसाठी मानधनाची रक्कम वाढवलेल्या करीनाची पाठराखण करत तापसी म्हणाली…

 

View this post on Instagram

 

A post shared by Malav Rajda (@malavrajda)

आणखी वाचा : स्वत: वरचं मीम शेअर करत अभिषेकने दिली नेटकऱ्यांना शिकवण

सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. तर अनेकांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, ‘जेठालाल कडून चूर्ण घ्या’. तर दुसरा नेटकरी म्हणाला, ‘कायम चूर्ण वापरूण पाहा’, अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी मालव यांच्या या विनोदी व्हिडीओवर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.