छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ गेल्या १३ वर्षांपासून आपले मनोरंजन करत आहे. या मालिकेतील टप्पूची भूमिका साकारणारा अभिनेता राज अनादकट पुन्हा एकदा ट्रोलिंगचा शिकार झाला आहे. राजने मालिकेत बबिता जींची भूमिका साकारणाऱ्या मुनमुन दत्ताच्या एका पोस्टवर कमेंट केल्यानंतर सोशल मीडियावर त्याला ट्रोल करण्यात आले आहे.
मुनमुनने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत मुनमुनने आधी जांबळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे आणि नंतर लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. मुनमुनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. मात्र, सगळ्यांचे लक्ष हे राजच्या कमेंटने वेधले आहे. राजने फायर इमोजी सोबत हार्ट इमोजी कमेंटमध्ये वापरल्याने सोशल मीडियावर तो ट्रोल झाला आहे.
राजला ट्रोल करत एक नेटकरी म्हणाला, ‘टप्पू, काकूला पटवलं तू.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘मुनमुन दत्ता आणि राज अनादकर यांच अफेअर असल्याचे चित्र दिसतं आहे. दोघांनाही थोडी लाज वाटली पाहिजे.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘राज आणि मुनमुनचं लग्न होणार.’ आणखी एक नेटकरी म्हणाला, ‘राज बेटा मस्ती नाही पण तुझी पत्नी सुंदर आहे.’
आणखी वाचा : आमिर आणि किरण रावच्या घटस्फोटानंतर इम्रानच्या पत्नीने केली होती ‘ही’ पोस्ट
राज आणि मुनमुन हे दोघे ही चांगले मित्र आहेत. राज आणि मुनमुन एकमेकांच्या पोस्टवर नेहमीच कमेंट करताना दिसतात. याआधी ही बऱ्याच वेळी मुनमुनच्या पोस्टवर कमेंट केल्यामुळे राज ट्रोल झाला आहे.