‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील जेठालाल, दयाबेन, तारक मेहता, अंजली भाभी, सोनू, टप्पू, बबिता ही सर्वच पात्र कायमच चर्चेत असतात. सध्या सोशल मीडियावर सोनूची भूमिका साकारणारी अभिनेत्री निधी भानुशालीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

२०१९मध्ये निधीने मालिका सोडली. पण त्यानंतरही ती चर्चेत आहे. ती सतत सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. सध्या निधीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती स्विमिंगपूलमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने ‘शांत’ असे कॅप्शन दिले आहे. या व्हिडीओवर चाहत्यांना लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

Akshay kumar movie with 15 heroines
अक्षय कुमारच्या ‘या’ चित्रपटात होत्या तब्बल १५ अभिनेत्री, ३० कोटींचं बजेट असलेल्या सिनेमाने कमावले होते…
mukta barve different look viral
मोठा चष्मा, वयस्कर लूक अन्…; ‘या’ अभिनेत्रीला ओळखलंत का? चित्रपटसृष्टीत २० वर्षे गाजवतेय अधिराज्य
sakshi Tanwar
सीबीआय अधिकाऱ्याची लेक, IAS व्हायचं स्वप्न पण झाली अभिनेत्री; ५१ व्या वर्षीही अविवाहित ‘प्रिया’ आहे एका मुलीची आई
When Madhuri Dixit fan called her aunty video viral
Video: जेव्हा माधुरी दीक्षितला ‘आंटी’ म्हणून मारली हाक, अभिनेत्रीची होती ‘ही’ प्रतिक्रिया, व्हिडीओ व्हायरल
90s filmfare award show viral video
90’s चे सिनेस्टार! नव्वदच्या दशकातील फिल्मफेअर पुरस्काराचा VIDEO व्हायरल, नेटकरी म्हणाले, “हा बॉलीवूडचा सुवर्णकाळ..”
yeh hai mohabbatein fame krishna mukherjee shocking revelations about the Shubh Shagun producer of her show and reveals of being harassed
“निर्मात्याने मेकअप रुममध्ये केलं बंद अन्…”, प्रसिद्ध अभिनेत्रीनं सांगितला मालिकेच्या सेटवरील धक्कादायक प्रसंग, म्हणाली…
Mumtaz urges on lifting ban on Pakistani artists in India
“आपल्या चित्रपटसृष्टीत प्रतिभावान…”, पाकिस्तान भेटीनंतर बॉलीवूड अभिनेत्रीने केलं तिथल्या कलाकारांचं कौतुक
Aai kuthe kay karte fame actress akshaya gurav replace sana sayyad palki in kundali bhagya
‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री झळकणार लोकप्रिय हिंदी मालिकेत, साकारणार प्रमुख भूमिका!

 

View this post on Instagram

 

A post shared by Nidhi Bhanushali (@_ninosaur)

यापूर्वी निधीने जंगलात फिरतानाचा फोटो शेअर केला होता. हा व्हिडीओ शेअर करत निधीने ‘जंगलात फिरण्याचा एक वेगळाच आनंद आहे’ या आशयाचे कॅप्शन दिले होते. तिचा हा व्हिडीओ एक लाखापेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे. जंगलात फिरताना निधीसोबत तिचा पाळीव श्वानदेखील असल्याचे दिसत होता.

निधी ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने तारक मेहता का उलटा चष्मामध्ये सोनू ही भूमिका साकारली होती. जवळपास ६ वर्ष तिने या मालिकेत काम केले होते. त्यानंतर २०१९मध्ये तिने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला.