कोणती ही मालिका असो किंवा चित्रपट सेटवर भेटल्यानंतर आपल्या सह-कलाकाराशी आपली चांगली मैत्री होती. कारण आपण जास्तवेळ त्यांच्या सोबतच असतो. मालिकेत नवीन कलाकार आल्यावर त्याच्याशी जुळवून घेणे अनेकदा जुन्या कलाकारांसाठी कठीण जाते, असेच काही तरी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेत घडलं. या मालिकेतील अभिनेता कुश शाह ऊर्फ गोलीला सोनू म्हणजेच निधी भानुशाली आवडत नव्हती आणि सुरुवातीलाच त्यांच्यात वादही झाला होता. हा खुलासा कुशने एका मुलाखतीत केला आहे.

निधी आणि कशु हे आता जवळचे मित्र असले तरी त्यांच्या मैत्रिची सुरुवात ही चांगली झाली नव्हती. मालिका सुरु झाली तेव्हा झील मेहता सोनूची भूमिका साकारत होती. मात्र, त्यानंतर निधी सोनूची भूमिका साकारु लागली. निधीने २०१३-१९ अशी सहा वर्षे सोनूची भूमिका साकारली. तरी, टप्पू सेनेशी तिचे काही जमतं नव्हते असं कुशने सांगितले.

आणखी वाचा :  ‘त्या’ चित्रपटामुळे एक एक सामान विकावे लागले होते, जमिनीवर झोपायची आली होती वेळ – जॅकी श्रॉफ

 

View this post on Instagram

 

A post shared by Kush (@kushahh_)

संपूर्ण टप्पू सेनाने ‘टीव्ही टाइम्स’ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत टप्पू सेनाने मालिकेत निधीची सुरुवात कशी होती ते सांगितलं आहे. सुरुवातीला निधी कोणालाच आवडत नव्हती आणि गोली शिवाय कोणी या विषयी बोलतं नव्हतं. ते सगळे झीलचे जवळचे मित्र होते आणि तिच्या जागेवर निधीला नवीन ‘सोनू’ म्हणून स्वीकारण्यासाठी आणि तिच्याशी मैत्री करण्यात त्यांना थोडा वेळ लागला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nidhi Bhanushali (@_ninosaur)

आणखी वाचा : इंडियन आयडल १२ : ‘या’ दोन गायकांना हिमेश रेशमीयाने दिली म्युझिक अल्बममध्ये संधी

तर याविषयी निधी म्हणाली, सुरुवातीला तिच्यात आणि कुशमध्ये भांडण देखील झालं होतं. मात्र, थोडा वेळ झाल्यानंतर त्यांच्यात सगळ्या गोष्टी नीट झाल्या आणि आज ते चांगले मित्र आहेत.