बॉलिवूडची हरहुन्नर अभिनेत्री तब्बू ही तिने साकारलेल्या भूमिकांसाठी प्रेक्षकांच्या मनावर आजही अधिराज्य करतेय. आता तब्बू तिच्या चाहत्यांसाठी आणखीन एक आनंदाची बातमी घेऊन आली आहे. पण तुम्हाला वाटतंय तसं काही नाहीये… तब्बू काही लग्न वैगेरे करणार नाहीये तर तिचा आगामी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात ती तिच्याहून १३ वर्षांनी लहान असणारा अभिनेता आयुषमान खुरानाशी रोमान्स करताना दिसणार आहे.
‘इंदु सरकार’वर जरा जास्तच खुश सेन्सॉर बोर्ड अध्यक्ष
सध्या या सिनेमाचं नाव मुड मुड के ना देख असं ठेवण्यात आल्याचं म्हटलं जातंय. पण याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
सिनेमाचं नाव १९५५ मध्ये आलेल्या राज कपूर यांच्या ‘श्री ४२०’ या सिनेमातील सुपरहिट गाण्यातून घेण्यात आलं आहे. सध्या या सिनेमाचं चित्रीकरण लोणावळा आणि पुणे येथील अनेक लोकेशनवर सुरू आहे.
तब्बूने २००७ मध्ये याआधी आर. बाल्कीच्या ‘चीनी कम’ सिनेमात आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या अमिताभ बच्चन यांच्यासोबत रोमान्स केला होता. हा सिनेमा चांगलाच हीट झाला होता. या सिनेमातील जोडीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. पण या आगामी सिनेमात ती तिच्याहून वयाने लहान असलेल्या अभिनेत्यासोबत रोमान्स करणार आहे. त्यामुळे ही जोडी नेमकी काय धमाल करणार याची उत्सुकता आता प्रेक्षकांना लागली आहे.
‘फितूर’ सिनेमानंतर तब्बू कोणत्याच सिनेमात दिसली नव्हती. सध्या तब्बू रोहित शेट्टीच्या ‘गोलमाल अगेन’ आणि ‘मुड मुड के ना देख’ या सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. बदलापूर सिनेमाचा दिग्दर्शक श्रीराम या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहे.