अभिनेता सैफ अली खानपेक्षाही त्याचा मुलगा तैमुरची फार क्रेझ आहे. एखाद्या सेलिब्रिटीइतकंच त्याचं स्टारडम आहे. सैफने नुकतीच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या वाहिनीवर ‘लाइव्ह’ असताना न्यूज अँकरने तैमुरला कॅमेरासमोर आणण्याची विनंती केली. ‘वाहिनीच्या प्रेक्षकांना तैमुर फ्लाइंग किस देईल का’ असं तिने सैफला विचारलं. त्यावर सैफने जे उत्तर दिलं, ते ऐकून तुम्हालाही हसू अनावर होईल.

वाहिनीवर ‘लाइव्ह’ मुलाखत सुरू असताना तैमुरला घेऊन येतो असं म्हणत सैफ जागेवरून उठला. थोड्या वेळाने परत आल्यावर तो न्यूज अँकरला म्हणाला, ‘सॉरी… तैमुर शी करतोय.’ सैफचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सैफने मुद्दाम न्यूज अँकरची खिल्ली उडवली का, असा प्रश्नही नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

या मुलाखतीदरम्यान नंतर तैमुर सैफच्या मागे फिरताना दिसतो. थोड्या वेळासाठी मुलाखत थांबवून सैफ तैमुरला कॅमेरासमोर घेऊन येतो. मास्क आणि ग्लोव्ह घातलेला तैमुर कॅमेरासमोर सर्वांना ‘हॅलो’ बोलून निघून जातो.

Story img Loader