अभिनेत्री तमन्ना भाटिया सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून ती कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहते. यावेळी तिचा एक मिशिवाला व्हिडीओ चर्चेत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही देखील तमन्नाला विचाराल की लॉकडाउनमध्ये मिशा आल्या का?

अवश्य पाहा – आणखी एका ‘पॉर्नस्टार’ची बॉलिवूडमध्ये एण्ट्री; राम गोपाल वर्मांच्या चित्रपटात करणार काम

 

View this post on Instagram

 

Super #tamanna

A post shared by ᴛᴀᴍᴀɴɴᴀᴀʜ ʙʜᴀᴛɪᴀ (@tamannaah__bhatia) on

अवश्य पाहा – “…अन्यथा माझे मित्रमंडळीही आत्महत्या करतील”; निया शर्माला वाटतेय भीती

तमन्नाने हा गंमतीशीर व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तमन्नाने स्पेशल इफेक्टच्या मदतीने आपल्या चेहऱ्यावर मिशा लावल्या आहेत. या मिशांना ती पिळ देण्याचा प्रयत्न देखील करत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला आपले हसू रोखता येणार नाही. तमन्ना ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर तिचे २० लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. या पार्श्वभूमीवर तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

यापूर्वी तमन्ना पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू अब्दुल रज्जाकमुळे चर्चेत होती. मन्ना आणि अब्दुल रज्जाक यांचा एका ज्वेलरीच्या दुकानातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. फोटोमध्ये दोघांच्याही हातात सोन्याचे दागिने होते. त्यांचा हा फोटो पाहून ते दोघं लग्न बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. परंतु फोटो व्हायरल झाल्यानंतर तमन्नाने त्या फोटोमागील सत्य सांगितले होते.