दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थ कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असतो. नुकतेच सिद्धार्थने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तो मृत असल्याचा दावा करणारे एक ट्वीट शेअर केले आहे. त्याचे हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे.

सिद्धार्थने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत एका नेटकऱ्याने सिद्धार्थला सिद्धार्थ शुक्ला समजत श्रद्धांजली दिली आहे. ही पोस्ट शेअर करत ‘एखाद्यावर मुद्दामून निशाणा साधून द्वेश आणि छळ पसरवण्याच्या कोणत्या पातळीवर आपण आलो आहोत’, असे कॅप्शन दिले आहे.

आणखी वाचा : सिद्धार्थने शेहनाजच्या कुशीत घेतला शेवटचा श्वास?

सिद्धार्थ शुक्ला आणि या सिद्धार्थमध्ये नेटकऱ्यांना गोंधळ झाला असेल असे आधी वाटले. मात्र, सिद्धार्थची ही पोस्ट पाहूनही नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केले आहे. एक नेटकरी म्हणाला, ‘त्या सिद्धार्थच्या जागी देवाने या सिद्धार्थला घेऊ जायला पाहिजे होते’, अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केले आहे. या आधी सिद्धार्थने सिद्धार्थ शुक्लाला श्रद्धांजली देत एक ट्वीट केले होते.

आणखी वाचा : वयाच्या ४०व्या वर्षी निधन झालेला अभिनेता सिद्धार्थ शुक्ला आहे तरी कोण?

सिद्धार्थने २०१४ मध्ये आलिया भट्ट आणि वरुण धवन यांच्या ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तो एकता कपूरचा लोकप्रिय सीरिज ‘ब्रोकन बट ब्यूटीफुल ३’ मध्ये दिसला होता. या सीरिजमध्ये त्याने अगस्त्याची भूमिका साकारली होती.

 

Story img Loader