‘वंडर वुमन’ या बहुचर्चित सिनेमामध्ये भूमिका साकारलेली इस्राईलची अभिनेत्री गल गडॉट सर्वांनाच परिचित आहे. सिनेमात चित्तथरारक असे स्टंट्स करून प्रेक्षकांना आश्यर्यचकित करणाऱ्या गल गडॉटचे जगभरात अनेक चाहते आहेत. २००४ मध्ये तिने ‘मिस युनिव्हर्स’ सौंदर्यस्पर्धेत आपल्या राष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं होतं. त्याचप्रमाणे वयाच्या १८व्या वर्षी तिने ‘मिस इस्राईल’चा किताब पटकावला होता.

२००४ मध्ये ‘आशिक बनाया आपने’ फेम तनुश्री दत्तासुद्धा ‘मिस युनिव्हर्स’ सौंदर्यस्पर्धेत सहभागी झाली होती. या स्पर्धेत टॉप १० मध्ये तनुश्री दत्ताची निवड झाली तर गडॉट बादफेरीपर्यंतसुद्धा पोहोचू शकली नव्हती. आहे ना ही धक्कादायक बातमी? तनुश्री दत्ताने २००५ मध्ये ‘चॉकलेट’ आणि ‘आशिक बनाया आपने’ या चित्रपटांसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्याआधी २००३ मध्ये मुंबईत झालेल्या ‘फेमिना मिस इंडिया’चा किताब पटकावला होता. देशातील १३३ स्पर्धकांमधून तनुश्रीने हा किताब पटकावला होता.

wonder-woman-poster-759

वाचा : दीपिकासाठी रणवीरचा कतरिनाला नकार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘जागतिक पातळीवर माझ्या देशाचं प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी माझ्यावर होती आणि मी ते गंभीरतेने घेतलं नाही,’ असं गडॉटने नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत सांगितलं. आता १३ वर्षांनंतर गडॉट एक जागतिक सेलिब्रिटी आहे. बॅटमॅन, सुपरमॅन, स्पाईडरमॅनसारख्या सर्व सुपरहिरोंना मागे टाकत गल गडॉट ‘वंडर वुमन’ म्हणून अग्रस्थानी आहे. ‘वंडर वूमन’ हा सिनेमा जगभरात जोरदार कमाई करत आहे. जगभरात १० दिवसांत या सिनेमाने सुमारे ४०० मिलियन डॉलर्सची कमाई केली आहे.