छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये काम केलेला अभिनेता अतुल विरकरने सोशल मीडिया पोस्टद्वारे मुलाच्या उपचारासाठी मदत मागितली आहे. करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे काम मिळत नसल्याने आर्थिक परिस्थिती खालावली असून मुलाच्या उपचारासाठी त्याने लोकांकडे मदत मागितली आहे.

अभिनेता वरद विजय चव्हाणने फेसबुकवर पोस्ट शेअर करत चाहत्यांना अतुलची मदत करण्याचे आवाहन केले आहे. ‘नमस्कार मित्रांनो आपला मित्र अतुल विरकर यांचा मुलगा प्रियांशा एका दुर्दम्य आजाराला समोरा जात आहे. सर्वांना विनंती आहे की एकदा ही पोस्ट वाचा आणि जमल्यास अतुल विरकरला यांना मदत करा’ असे वरदने पोस्टमध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा: ‘तुझा बॉयफ्रेंड कोण आहे?’ असे विचारणाऱ्याला जाणून घ्या रिंकू काय म्हणाली

वरदने फेसबुकवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये अतुलच्या मुलाला ‘आलन हार्डून ड्युडली सिंड्रम्स’ हा आजार आहे. गेल्या वर्षभरात त्याने तीन लाख रुपये खर्चे केले आहेत. आता पुढील उपचारांसाठी अतुलला आर्थिक मदतीची गरज आहे. येत्या सहा महिन्यांमध्ये ५० हजार रुपयांची गरज आहे. त्यामुळे कृपया मदत करा असे म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अतुलने ‘माझ्या नवऱ्याची बायको’, ‘लव्ह लग्न लोचा’, ‘तू माझा सांगाती’ या मालिकांमध्ये काम केले आहे. पण करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे गेली एक वर्ष त्याला काम मिळत नाही. त्यामुळे मुलाच्या उपचरासाठी त्याने चाहत्यांकडे मदत मागिती आहे.