छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ या मालिकेतील जेठालाल, दयाबेन, चंपकलाला, तारक मेहता ही सगळीच पात्र कायम चर्चेत असतात. पण दयाबेन हे पात्र साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी २०१७पासून मालिकेपासून लांब आहे. गर्भवती असताना तिने मालिकेतून ब्रेक घेतला होता. ४ वर्षे उलटली तरी देखील चाहते तिची प्रतिक्षा करत आहेत. आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दयाबेनच्या भूमिकेत अभिनेत्री गरिमा दिसत आहे. या व्हिडीओवर कमेंट करत चाहत्यांनी निर्मात्यांना नवी दयाबेन मिळाली असे म्हटले आहे.

गरिमाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती दयाबेनच्या लूकमध्ये दिसत आहे. तिचा हा लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. अनेकांनी कमेंट करत तू तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेत दयाबेनच्या भूमिकेत दिसणार आहेस का? असे विचारले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने मालिकेचे निर्माते आसित मोदी यांना टॅग करत गरिमाचा लूक पाहा असे म्हटले आहे.

आणखी वाचा : ‘तारक मेहता..’मधील हे कलाकार अजूनही आहेत अविवाहीत

गेल्या काही दिवसांपासून दयाबेन म्हणजेच दिशा वकानी मालिकेपासून लांब असल्याचे पाहायला मिळते. चाहते तिच्या परतण्याची आतुरतेने वाट पाहात आहेत. सध्या सोशल मीडियावर गरिमाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओपाहून लवकरच गरिमा दयाबेनच्या भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले जात आहे.

व्हिडीओमध्ये गरिमा दयाबेनच्या भूमिकेत दिसत आहे. ती ‘जेठालाल’ ऐवजी ‘पेठालाल’ला बोलवताना दिसत आहे. तसेच ‘बबीता जी’च्या ऐवजी ती ‘कविता जी’ देखील बोलताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर तिचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.