‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेली अनेक वर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. मालिकांच्या विषयांमधील तोच तो एकसारखेपणा टाळत ही मालिका प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत आहे.गोकुळधाम सोसायटीत राहणारे जेठालाल, दयाबेन, भिडे, माधवी, कोमल, बबिता, अंजली ही सर्वच पात्र खूप प्रसिद्ध आहेत. पण, त्यातील पोपटलाल हे पात्र खूपच रंजक आहे. लग्नाचं वय उलटूनही अद्याप बोहल्यावर न चढल्याने पोपटलाल कावराबावरा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. मात्र, त्याच पोपटलालचं आता लग्न झालं आहे.

काही दिवसांपूर्वी गोकुळधाम सोसायटीत राहणाऱ्या पोपटलाच्या घराच्या बाल्कनीत एक नवविवाहित तरुणी उभी असल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे या मुलीला पाहून सोसायटीतील सदस्यांनादेखील धक्का बसला आहे. मात्र, पोपटलालने खरंच लग्न केलं आहे यावर त्यांचा आता विश्वास बसला आहे. इतकंच नाही तर आता या नवविवाहितेचं स्वागत करण्यासाठी संपूर्ण गोकुळधाम सोसायटी नवीन प्लॅन करत आहे.

आणखी वाचा- मिताली-सुयशच्या प्रेमाला बहर; काय आहे त्यांचं ‘हॅशटॅग प्रेम’?

दरम्यान, पोपटलालचं लग्न कधी होणार हा प्रश्न केवळ गोकुळधाम सोसायटीतील रहिवाशांनाच नव्हे तर ही मालिका पाहणाऱ्या सर्वसामान्य प्रेक्षकांना देखील पडला होता. मात्र, आता पोपटलालचं लग्न झालं असून या पुढे ही मालिका कोणत्या रंजक वळणावर जाणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Story img Loader