छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक मालिका म्हणजे ‘अग्गंबाई सासूबाई.’ अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. या मालिकेतील बबड्या आणि शुभ्राच्या जोडीला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळाले होते. बबड्याची भूमिका अभिनेता आशुतोष पत्कीने साकारली होती तर शुभ्रा हे पात्र अभिनेत्री तेजश्री प्रधानने साकारले होते. या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी आशुतोष आणि तेजश्री हे चर्चेत असतात. नुकताच आशुतोषने तेजश्रीसोबतचा शेअर केलेला फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून चर्चेत आहे.

२ जून रोजी तेजश्रीचा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने आशुतोषने तिच्यासोबतचा एक फोटो शेअर करत पोस्ट लिहिली होती. ‘माझी बेस्ट फ्रेंड.. मला तुला सांगायचे आहे की तू माझ्यासाठी खूप काही आहेस. तू मला आतापर्यंत दिलेला पाठिंबा, प्रोत्साहन आणि मी एक चांगला व्यक्ती व अभिनेता होण्यासाठी मला केलेली मदत यासाठी मी मनापासून तुझे आभार मानतो’ या आशयाचे कॅप्शन त्याने दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by (@ashutoshpatki)

आणखी वाचा : …म्हणून नर्गिस यांना संजय दत्त गे वाटायचा

पुढे तो पोस्ट शेअर करत म्हणाला, ‘वाढदिवशी मी तुला दोन टीप्स देतोय. पहिली म्हणजे भूतकाळ विसर कारण आपण तो बदलू शकत नाही. दुसरी टीप म्हणजे गिफ्ट विसरून जा… ते मी तुझ्यासाठी आणलंच नाही. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.’

tejashri pradhan and ashutosh patki,

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या तेजश्री आणि आशुतोषचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. एका यूजरने ‘लवकरच घोषणा होण्याची वाट पाहू शकतो का?’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘ते आधीपासूनच कपल आहेत’ असे म्हटले आहे. त्यांच्या या फोटोवरव अनेकांनी कमेंट केल्या आहेत. सध्या त्यांची ही पोस्ट आणि फोटो पाहून हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.