‘ससुराल सिमर का’ फेम अभिनेत्री दीपिका कक्कर आणि अभिनेता शोएब इब्राहिम काही दिवसांपूर्वीच विवाहबंधनात अडकले. भोपाळमध्ये मोठ्या थाटामाटात शोएब आणि दीपिकाचा विवाहसोहळा पार पडला. त्यांच्या विवाहसोहळ्यातील बऱ्याच फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधलं. चाहत्यांनी या सेलिब्रिटी जोडीला त्यांच्या आयुष्यात आलेल्या नव्या वळणाबद्दल शुभेच्छाही दिल्या. पण, काहींनी त्यांच्या लग्नाच्या मुद्द्यावरुन एक प्रश्न उपस्थित केल्याचंही पाहायला मिळालं. दीपिका आणि शोएब या दोघांचे धर्म वेगळे असल्यामुळे दीपिकाच्या धर्माच्या मुद्दयावरुन बऱ्याच चर्चा रंगण्यास सुरुवात झाली. या सर्व चर्चा पाहता, आपण इस्लाम धर्म स्वीकारला असून, ही अत्यंत खासगी बाब असल्याचं तिने स्पष्ट केलं.

‘हो हे खरंय, मी इस्लाम धर्म स्वीकारला आहे. पण, हे सर्व मी कधी, केव्हा आणि का केलं याविषयी चर्चा होण्याची इतकी आवश्यकता नाही’, असं ती ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली. ‘माझ्यामते ही बाब पूर्णपणे खासगी असून, त्याविषयी माध्यमांसमोर खुलेपणाने चर्चा करण्याची मला गरज वाट नाही. चाहते आणि माध्यमांसाठी आम्ही कलाकार नेहमी बऱ्याच गोष्टी शेअर करत असतो. आमच्या आनंदाच्या क्षणांमध्येही त्यांना सहभागी करुन घेतो. पण, ही (धर्मांतराची गोष्ट) अतिशय खासगी असून, आमच्या खासगी आयुष्यात डोकावण्याची कोणालाच अनुमती नाही. हे खरंय (धर्मांतराची गोष्ट), मी ती नाकारतही नाहीये. मुळात मला या गोष्टीचा प्रचंड अभिमान वाटत असून हा निर्णय घेतल्याचा मला आनंद होतोय. हा निर्णय घेतेवेळी कुटुंबाने मला साथ दिली. मुळात या निर्णयामुळे मला कोणाच्याही भावना दुखावायच्या नव्हत्या कारण हा सर्वस्वी माझा निर्णय होता’, असं दीपिकाने स्पष्ट केलं.

पाहा : VIDEO : अबॉटच्या ‘या’ उसळत्या चेंडूमुळे दुर्दैवी आठवणींना पुन्हा जाग

https://www.instagram.com/p/Bf43ybMl91r/

https://www.instagram.com/p/Bfi6cJ2FslB/

सेलिब्रिटींच्या आयुष्यात कधकधी चाहत्यांचं प्रमाणापेक्षा जास्त डोकावणं, ही बाब आपल्यालाही पटत नसून आम्हीही सर्वसामान्य व्यक्ती आहोत आणि त्याचप्रमाणे आम्हाला जगू द्यावं अशी भूमिका शोएबने मांडली.

https://www.instagram.com/p/BfgQWadFuHR/

https://www.instagram.com/p/Bfs_nB8FCzk/