‘फॅमिली टाईम विथ कपिल शर्मा’ या नव्या कोऱ्या शोसह विनोदवीर कपिल शर्माने छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं. त्याचा हा कार्यक्रम सुरु होण्यापूर्वीच प्रेक्षकांमध्ये कमालीचं उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळालं होतं. पण, ज्या अपेक्षा आणि उत्साही वातावरणामुळे या कार्यक्रमाविषयीच्या चर्चा रंगल्या होता तो उत्साह क्षणातच मावळल्याचं पाहायला मिळालं.

प्रेक्षकांना खळखळून हसवण्याच्या उद्देशाने सुरु झालेल्या या शोचा पहिला प्रयोगच फसला आणि कपिलच्या पदरी निराशा आली. मुख्य म्हणजे कपिलच्या विनोदबुद्धीवरही अनेकांनीच निशाणा साधला. किकू शारदाने पुन्हा या कार्यक्रमात स्त्री पात्र साकारलं, तर चंदन प्रभाकरनेही त्याला दिलेली भूमिका चांगलीच निभावली पण या साऱ्यात कपिल मात्र कुठेतरी मागे पडल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली. त्याच्या या कार्यक्रमात मराठमोळ्या नेहा पेंडसेचाही सहभाग पाहायला मिळाला.

वाचा : स्टिव्ह स्मिथला माफ करा – मायकल क्लार्क

कलाकारांची साथ मिळाली असली तरीही कपिलचा आधीचा शो याहून कैक पटींनी चांगला असल्याच्याच मतावर चाहते ठाम असल्याचं त्यांच्या प्रतिक्रियांच्या माध्यमातून स्पष्ट झालं. आधीच्या शोमध्ये कपिल सेलिब्रिटींसोबत गप्पा मारतांना, त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारत, त्यांवर प्रासंगिक विनोदाची उधळण करताना दिसायचा. याऊलट नव्या शोमध्ये मात्र तो ही रुपरेषा काहीशी बदलली आहे. त्यामुळेच का असेना पण, कपिलची जादू मात्र ओसरली आहे असाच तर्क चाहत्यांनी लावला आहे.

https://twitter.com/rohankumarborad/status/978102227536523264

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

https://twitter.com/Chauhan_VijayK/status/978097788352368640