तेलगु अभिनेता सम्राट रेड्डीला पत्नीच्या घरी चोरी केल्याच्या आरोपावर अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरोधातील ही तक्रार दुसऱ्या कोणी नाही तर त्याच्या पत्नीनेच केली आहे. पोलिसांच्या मते, गेल्या काही दिवसांपासून सम्राट त्याच्या पत्नीला त्रास देत होता. सम्राटच्या विरोधात तक्रार नोंदवण्यात येण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधीही कौटुंबिक हिंसा आणि हुंडा मागण्यासाठी त्याच्याविरोधात तक्रार करण्यात आली होती. हे कमी होते की काय आता त्याच्यावर पत्नीच्या घरी घुसून चोरी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सम्राट आणि त्याची पत्नी हर्षिता यांची २ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. पण लग्नानंतर दोघांमध्ये खटके उडायला लागले आणि दोघांनीही वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. हर्षिताने राजेंद्रनगर पोलीस ठाण्यात सम्राटविरोधात गुन्हा नोंदवीण्यात आला आहे. सम्राटविरोधात कलम ४९८/ए लावण्यात आले आहे. हर्षिता म्हणाली की, सम्राट तिच्या घरी फक्त चोरून घुसला नाही तर त्याने सीसीटीव्ही कॅमेरेही तोडले. यानंतर त्याने कपाटात ठेवलेले पैसे आणि दागिने चोरण्याचा प्रयत्न केला. हर्षिताच्या या तक्रारीवर पोलिसांनी सम्राटला अटक केली असून पुढील तपास सुरू केला आहे.