‘स्टुडण्ट ऑफ द इयर’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि ‘दबंग गर्ल’ सोनाक्षी सिन्हा हे ‘इत्तेफाक’ या चित्रपटात दिसणार आहेत. रुपेरी पडद्यावर एकत्र काम करण्याची ही त्यांची पहिलीच वेळ. या दोन्ही कलाकारांनी गुरुवारी आपल्या या चित्रपटाचे खास स्क्रीनिंग आयोजित केले होते. या स्क्रिनिंगला कतरिना कैफ, सुहाना खान, दीपिका पदुकोण, क्रिती सनॉन, अनन्या पांडे, करण जोहर, अर्जुन कपूर, आफताब शिवदासानी, आयुषमान खुराना यांच्यासह बॉलिवूडमधील बरीचशी मंडळी उपस्थित होती. मात्र, यामध्ये सिद्धार्थची प्रेयसी आलिया भट्ट दिसली नाही. आलिया या स्क्रीनिंगला का गेली नाही, याविषयी आता अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. पण, तिच्या न जाण्यामागचे कारण काही वेगळेच आहे.

वाचा : रणवीरच्या ‘त्या’ ट्विटचा नेमका अर्थ काय? ब्रेकअप की…

खरंतर, त्यावेळी आलिया तिची जवळची मैत्रीण आणि प्रसिद्ध डिझायनर मसाबा गुप्ता हिच्यासोबत पार्टी करण्यात दंग होती. मसाबाच्या ३२व्या वाढदिवसानिमित्त जंगी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीला सोनम कपूरही उपस्थित होती. आलियाने मसाबाच्या बर्थडे पार्टीतील फोटो तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर केले होते. याआधी आलियाने शाहरुखच्या ग्रॅण्ड बर्थडे पार्टीत हजेरी लावली होती. अलिबागमध्ये झालेल्या या पार्टीत अवघे बॉलिवूड विश्व अवतरले होते. त्यावेळी आलिया आणि सिद्धार्थही पार्टीचा आनंद घेताना दिसले.

वाचा : अमृताने केला तिच्या ‘क्रश’चा खुलासा

‘इत्तेफाक’मध्ये सिद्धार्थ, सोनाक्षीसोबत अक्षय खन्नाचीही मुख्य भूमिका आहे. हा चित्रपट यश चोप्रा यांच्या १९६९ साली आलेल्या ‘इत्तेफाक’ चित्रपटाचा रिमेक आहे. अभय चोप्रा दिग्दर्शित इत्तेफाकची निर्मिती ‘रेड चिलिज एण्टरटेन्मेन्ट’ आणि ‘धर्मा प्रोडक्शन’ने केली आहे.

Story img Loader