‘कपिल शर्मा शो’च्या सेटवरील जंजीर आठवतोय का? सेटवर सर्वांचे मनोरंजन करणारा आणि अतिशय चपळ असलेल्या जंजीर या कुत्र्याचे नुकतेच निधन झाल्याचे वृत्त आहे. नऊ वर्षांच्या जंजीरने काल डॉ. स्वाली क्लिनिकमध्ये अखेरचा श्वास घेतला.
काही दिवसांपूर्वीच जंजीरचे रस्त्यावरील एका कुत्र्याशी भांडण झाले होते. यात तो बराच जखमी झाला होता. यानंतर त्याच्यावर उपचारही करण्यात आले मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. संसर्ग होऊ नये म्हणून डॉक्टर जंजीरला काल इंजेक्शन देत असतानाच त्याने शुद्ध हरपली आणि त्याचा मृत्यू झाला. जंजीरची कपिलशी खूप जवळीक होती. त्याला तो लाडाने ‘जंजू’ अशी हाक मारायचा. इतकेच नव्हे तर कपिलला नैराश्य आले तेव्हाही त्याला जंजूनेच साथ दिली होती. ‘फिरंगी’ चित्रपटाच्या प्रसिद्धीवेळी कपिल म्हणालेला की, मी नैराश्यात असताना स्वतःला कोंडून घेतले होते. त्यावेळी माझ्यासोबत केवळ जंजीर आणि दारुची बाटली होती.
‘कॉमेडी नाइट विथ कपिल’ या शोदरम्यान कपिलने जंजीरला दत्तक घेतले होते. मुंबईतील एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा कुत्रा असलेल्या जंजीरची आणि कपिलची ओळख त्याचा जवळचा मित्र गणेश याच्या घरी झाली. गणेशची पत्नी प्राण्यांसाठी एनजीओ चालवते. या एनजीओमध्ये अनाथ प्राण्यांची काळजी घेतली जाते. जंजीरचा शेवटच्या क्षणातील एक व्हिडिओ ‘स्पॉटबॉय ई’ वेबसाइटने शेअर केला आहे.
My new family member.. Zanjeer.. 🙂 he served as a cop in mumbai police 🙂 # respect. Will let u know abt him ltr 🙂 pic.twitter.com/ATZy7zL5YN
— Kapil Sharma (@KapilSharmaK9) July 10, 2014