बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनचा ‘द बिग बुल’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अभिषेक मुख्य भूमिकेत दिसत असून १९९२ मध्ये भारतीय शेअर बाजारात झालेल्या मोठ्या स्कॅममधील आरोपी हर्षद महेता यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. दरम्यान एका अभिनेत्रीने सोशल मीडिया पोस्टद्वारे द बिग बुल चित्रपट पाहिला आणि तो आवडला असल्याचेही म्हटले. अभिनेत्रीची अशी प्रतिक्रिया पाहाता नेटकऱ्यांनी अभिषेक बच्चनला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

अभिनेत्री सोफी चौधरीने ‘द बिग बुल’ हा चित्रपट पाहिला आणि चित्रपटासंबंधी ट्वीट केले. ‘आताच द बिग बुल हा चित्रपट पाहिला. चित्रपट पाहाताना मी पूर्णपणे आनंद घेतला. अभिषेक तू खूप हुशार आहेस. तुझे हावभाव आणि अभिनय खूप चांगला आहे. मला आवडलेल्या तुझ्या भूमिकांमधील ही एक भूमिका आहे. तुझे आणि तुझ्या संपूर्ण टीमचे अभिनंदन’ या आशयाचे ट्वीट तिने केले होते.

आणखी वाचा: ‘थर्ड क्लास अभिनय…’, द बिग बुल प्रदर्शित होताच अभिषेक बच्चन झाला ट्रोल

सोफीचे हे ट्वीट पाहून एका यूजरने ‘तुला चित्रपटाचा चांगला रिव्ह्यू देण्यासाठी पैसे दिले आहेत का? कारण बिग बुल हा टीव्हीवरील अतिशय वाईट चित्रपट आहे’ असे म्हटले आहे. त्याचे हे ट्वीट पाहून अभिषेक बच्चनने त्याला सुनावले आहे.

आणखी वाचा: समलैंगिक संबंधावर आधारित ‘हिज स्टोरी’ पोस्टर प्रकरणी एकता कपूरने मागितली माफी

‘थांब.. काय? सोफी तू मला सांगायला हवे होतेस. असे वागणे योग्य नाही. मी तुला याआधी केलेल्या प्रत्येक ट्वीटसाठी पैसे दिले असते’ या आशयचे ट्वीट अभिषेकने केले आहे.

यापूर्वी देखील अभिषेकला ‘द बिग बुल’ प्रदर्शित होताच ट्रोल करण्यात आले होते. ‘नेहमी प्रमाणे अभिषेक बच्चनने आपल्या थर्डक्साल अभिनयाने सर्वांना नाराज केलेले नाही. अतिशय घाणेरडी स्क्रिप्ट आणि चित्रपट. स्कॅम १९९२ खूप वेगळा होता’ या आशयाचे ट्वीट त्या यूजरने केले. त्यावर अभिषेकने देखील उत्तर देत ट्रोलरला सुनावले होते.

८ एप्रिल रोजी ‘द बिग बुल’ हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिषेक बच्चनसोबत इलियाना डिक्रुझ, निकिता दत्त, सुमित व्यास, राम कपूर, सोहम शाह हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. याच विषयावर गेल्या वर्षी ‘स्कॅम १९९२- द हर्षद मेहता स्टोरी’ ही वेबसीरीज आली होती. हंसल मेहता यांचं दिग्दर्शन असलेल्या वेबसीरीजमध्ये प्रतिक गांधी या कलाकाराने प्रमुख भूमिका साकारली आहे. या वेबसीरीजला प्रेक्षक, समीक्षक दोघांचीही पसंती मिळाली होती. आता द बिग बुल प्रदर्शित होताच चित्रपटाची तुलना ‘स्कॅम १९९२- द हर्षद मेहता स्टोरी’ या सीरिजशी केली जात आहे.