‘द फॅमिली मॅन-२’ या वेब सीरिजला प्रेक्षकांची मोठी पसंती पाहायला मिळाली. अ‍ॅक्शन, थ्रीलर आणि संस्पेन्स असलेल्या या वेब सीरिजला अनेक चाहत्यांनी तर अवघ्या एका दिवसात पाहून पूर्ण केलं. या वेब सीरिजमधील मनोज वाजपेयीसोबतच समंथा अक्किनेनीच्या भूमिकेचं मोठं कौतुक झालं. शोमधील प्रत्येक व्यक्तीरेखेने प्रेक्षकांच्य़ा मनात घरं कलेयं. यापैकी एक म्हणजे शोमधील श्रीकांत तिवारीचा सहकारी, त्याचा जीवाभावाचा मित्र आणि त्याच्या प्रत्येक मिशनमध्ये त्याच्या सोबत असणारा जेके तळपदे. या शोमधील जेके म्हणजेच अभिनेता शारिब हाशमीच्या अभिनयाचं प्रेक्षकांकडून कौतुक होतंय.

‘द फॅमिली मॅन-२’ या शोच्या यशानंतर अभिनेता शारिबने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या करिअरमधील काही खास गोष्टींचा खुलासा केला आहे. या मुलाखतीत सुशांत सिंह राजपूतसोबत त्याची काम करण्याची इच्छा अपूर्ण राहिल्याचं शारिब म्हणाला. या मुलाखतीत तो म्हणाला, “माझ्या एका सिनेमाचं फिल्मीस्तानमध्ये स्क्रीनिंग होतं. यावेळी बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांसोबतच सुशांत देखील तिथे आला होता. मी त्याच्या शेजारच्याच खुर्चीत बसलो. तो सिनेमा पाहताना मध्ये मध्ये हसत होता. सिनेमा संपताच त्याने मला आलिंगन दिलं. त्याने माझं कौतुकही केलं. सुशांतला तेव्हा मोठी लोकप्रियता मिळाली होती. मात्र तरीही तो खूप नम्र होता.मला आजही त्याचा हसरा चेहरा आठवतोय.” असं म्हणत शारिबने सुशांतच्या आठवणींना उजाळा दिला.

हे देखील वाचा: “लोक म्हणायचे मी काळी दिसते”; ‘द फॅमिली मॅन-२’ मधील अभिनेत्रीने केला वर्णभेदाचा सामना

हे देखील वाचा: “मी दुसरा सुशांत सिंह राजपूत बनणार नाही “; केआरकेची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत

सुशांतच्या निधनामुळे शारिबचं स्वप्न राहिलं अपूर्ण

पुढे शारिबने सांगितलं की ‘तकदूम’ नावाचा एक सिनेमा येणार होता. ज्यात सुशांत आणि परिणीती चोप्राची जोडी झळकणार होती. यात शारिबदेखील एक महत्वाची भूमिका साकारणार होता.मात्र काही कारणांमुळे या प्रोजेक्टचं काम रखडलं आणि सिनेमा होवू शकला नाही. त्यानंतर सुशांतने देखील या जगाचा निरोप घेतला. यामुळे शारिबचं सुशांतसोबत काम करण्याचं स्वप्न कायमचं अपूर्ण राहिलं.

शारिब हाशमीने २००८ सालातील ऑस्कर पटकावणाऱ्या ‘स्लमडॉग मिलियनेयर’ सिनेमातून करिअरची सुरुवात केली. त्यानंतर २०१२ सालात आलेल्या शाहरुख खानच्या ‘जब तक है जान’ या सिनेमात तो झळकला. लवकरच शारिब कंगनाच्या ‘धाकड’ सिनेमात झळकणार आहेत. तसचं ‘मिशन मजनू’ या सिनेमासह तो अनेक ओटीटी प्लॅटफॉर्मवरील शोमध्ये विविध भूमिका साकारताना दिसून येणार आहे.

Story img Loader