‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाची लाइन प्रोड्यूसर सराहनाचे निधन झाले आहे. बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे तिच्या निधनाची माहिती दिली आहे. सरहानाने आत्महत्या केल्याचे त्यांनी सांगितले आहे. तिच्या निधनाची बातमी ऐकून अनुपम खेर यांना धक्काच बसला आहे. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत श्रद्धांजली वाहिली आहे.
अनुपम खेर यांनी सराहनाचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत त्यांनी, ‘ही सरहाना आहे. ती कश्मीर फाइल्स चित्रपटाची लाइन प्रोड्यूसर होती. आम्ही मसूरी आणि डेहराडून येथे चित्रपटाचे एकत्र चित्रीकरण करत होतो. चित्रपटाच्या यूनिटने गेल्या वर्षी २२ डिसेंबर रोजी सेटवर तिचा वाढदिवस साजरा केला होता. लॉकडाउनमुळे ती गावी अलीगढ येथे गेली होती’ असे म्हटले आहे.
View this post on Instagram
पुढे ते म्हणाले, ‘तिचे काम खूप चांगले होते. माझ्या आईच्या वाढदिवशी सराहनाने एक मेसेज केला होता. मी तिला फोन केला आणि बराच वेळ आमचे बोलणे झाले. पण आज सकाळी मला तिच्या फोनवरुन एक मेसेज आला की सरहानाचे ३० जून रोजी निधन झाले. तिने आत्महत्या केली. तो मेसेज वाचून मला धक्का बसला. त्यानंतर मी सरहानाच्या आईला फोन केला आणि हे खरं आहे का विचारले.’
सरहानाने नैराश्यामुळे इतके टाकाचे पाऊल उचलले असल्याचे अनुपम खेर यांनी सांगितले आहे. ‘नैराश्याचा आजच्या तरुण पिढीवर परिणाम होत आहे. सरहानासाठी प्रार्थना करा’ असे ते पुढे म्हणाले.