गेल्या काही दिवसांत सेन्सॉर बोर्डाविरुद्ध अनेक कलाकारांनी आवाज उठवल्याचं पाहायला मिळालं. सेन्सॉर बोर्डाच्या वाढत्या हस्तपेक्षामुळे अनेक दिग्दर्शक, कलाकारांना त्यांचं रचनात्मक स्वातंत्र्य हरवल्यासारखं वाटत होतं. या वादातच सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांची खूर्ची जाणार असल्याची चर्चा असतानाच शुक्रवारी त्यांची उचलबांगडी करण्यात आली. केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाच्या (सीबीएफसी) अध्यक्षपदावरून पहलाज निहलानी यांना हटवत प्रसिद्ध गीतकार प्रसून जोशी यांची नियुक्ती करण्यात आली. तर सेन्सॉर बोर्डाच्या २३ सदस्यांच्या कार्यकारिणीत अभिनेत्री विद्या बालन हिचा समावेश करण्यात आला आहे. सरकारी जाहीरातींपासून ते सीबीएफसीच्या सदस्यपदापर्यंतचा तिचा प्रवास उल्लेखनीय आहे असं म्हणता येईल.

बॉलिवूडची ‘बेगमजान’ विद्या बालनची चित्रपटसृष्टीतील कामगिरी सर्वांनाच ठाऊक आहे. छोट्या पडद्यावरील ‘हम पांच’ मालिकेनंतर आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर तिने बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या तिच्या ‘द डर्टी पिक्चर’ चित्रपटातील भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कारानेही तिचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर २०१२ मध्ये तिची राष्ट्रीय स्वच्छता अभियानाच्या ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आली. ‘जहां सोच, वहां शौचालय’ या घोषवाक्यासोबत जाहिरातींमधून ती स्वच्छतेचा प्रचार करताना दिसली.

वाचा : नेहा धुपियाचा अपघात, मदतीऐवजी लोक सेल्फी काढण्यात मग्न

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सेन्सॉर बोर्डाच्या २३ सदस्यांच्या कार्यकारिणीत विद्या बालनसोबतच वामन केंद्रे, विवेक अग्निहोत्री आणि नरेंद्र कोहली यांचाही समावेश आहे. पहलान निहलानी यांचा कार्यकाळ अनेक वादांनी गाजला. त्यामुळे त्यांच्या उचलबांगडीने चित्रपट दिग्दर्शकांना दिलासा मिळाला असं म्हणायला हरकत नाही.