आमिर खानच्या ‘दंगल’ सिनेमाने जगभरातील यशस्वी परदेशी सिनेमांच्या टॉप ५ च्या यादीत आपले नाव प्रस्थापित केले आहे. ‘दंगल’च्या निर्मितीसाठी ७५ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला होता. पण याचा नफा २६ टक्के जास्त म्हणजे १९६१ कोटी रुपये एवढा झाला. बॉलिवूडमध्ये एवढी कमाई करणारा कोणताच सिनेमा नसेल असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकताय. बॉलिवूडमध्ये असेही काही सिनेमे होऊन गेलेत, ज्यांनी त्यांच्या निर्मितीपेक्षा कित्येक पटीने जास्तीची कमाई केली.

सेन्सॉर बोर्डापासून काहीच प्रॉब्लेम नाही- अजय देवगण

आम्ही बोलतोय ३० मे १९७५ मध्ये प्रदर्शित झालेला ‘जय संतोषी मां’ या सिनेमाबद्दल. फक्त पाच लाखांमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली होती. पण या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर पाच कोटींची कमाई केली होती. याच वर्षी ‘शोले’ आणि ‘दिवार’ हे दोन तगडे सिनेमे प्रदर्शित झाले होते. पण कोणतीही तगडी स्टारकास्ट नसताना या सिनेमाने  गोल्डन ज्युबली साजरी केली होती.

विजय शर्मा यांचे दिग्दर्शन असलेल्या ‘जय संतोषी मां’ सिनेमात अनिता गुहा, कनन कौशल, भारत भूषण आणि आशीष कुमार यांच्या मुख्य भूमिका होत्या. हा चित्रपट इतका प्रसिद्ध झालेला की, प्रेक्षक तेव्हा चक्क पायातल्या चपला बाहेर काढून सिनेमागृहात जायचे. पटनामधील एका व्यक्तीने या सिनेमातून स्वतःची भरपूर कमाईही केली. चपला सांभाळण्यासाठी त्याने सिनेमागृहाच्या बाहेर स्टॉल लावला होता. त्यातून त्याला भरपूर मिळकत मिळाली. असे म्हटले जाते की जोवर हा सिनेमा चालला तोवर या व्यक्तीने साधारणपणे १.७० लाख रुपये कमवले.

प्रेक्षकांना हा सिनेमा जेवढा आवडला, तेवढीच या सिनेमातील गाणीही प्रसिद्ध झाली होती. प्रदिप यांनी या सिनेमातील गाणी लिहिली होती. प्रदिप यांना ‘ऐ मेरे वतन के लोगो’ या गाण्यासाठी ओळखले जाते. त्या काळात पत्रं लिहिला जायची. पत्राच्या सुरूवातीला ओम लिहिण्याची पद्धत रुढ होती. पण या सिनेमाच्या प्रदर्शनानंतर अनेक निर्माते आपल्या सिनेमाच्या जाहिरातींवर जय संतोषी मां लिहायला लागले. अनेक निर्मात्यांच्या घरांच्यावरती ‘जय संतोषी मां’ असे लिहिलेले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिनेमाचे नाव ‘जय संतोषी मां’ असे होते. पण ‘संतोषी मां’ ची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री या सिनेमात पाहुणी कलाकार होती. अनिता गुहाने १० ते १२ दिवसच या सिनेमाचे चित्रीकरण केले होते. सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीन संतोषी मातेबद्दल फारसे कोणाला माहित नव्हते आणि त्यांचे उपवासही एवढे प्रसिद्ध नव्हते. पण या सिनेमाच्या प्रदर्शनानंतर प्रत्येक भाविक संतोषी मातेचा उपवास करु लागला.