पाकिस्तानमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तीफा इन ट्रबल’ या चित्रपटाची सध्या भारतात फार चर्चा होत आहे. ही चर्चा होण्यामागचं कारण म्हणजे त्यात बॉलिवूडचा बाजीराव अर्थात रणवीर सिंग पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत असल्याचं म्हटलं जात आहे. अली जफरची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट पाकिस्तानच्या बॉक्स ऑफीसवर सध्या धुमाकूळ घालत आहे. तर दुसरीकडे त्यात रणवीर नसून त्याचा फोटो मॉर्फ करून वापरण्यात आल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. त्यामुळे रणवीर नेमका या चित्रपटात आहे की नाही यावरून चाहत्यांचा पुरता गोंधळ उडाला आहे.

‘तीफा इन ट्रबल’ चित्रपटातील रणवीरचा पोस्टर शेअर करत तो फोटो एडीट केल्याचं स्पष्ट दिसून येत असल्याचं एका युजरने ट्विटरवर म्हटलं आहे. यावरूनच सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. एका जाहिरातीतील रणवीरचा फोटो एडीट करून तिथे वापरण्यात आल्याचं त्याने युजरने म्हटलं आहे. तर काहीजण रणवीरनेच तो फोटो चित्रपटात वापरण्यात दिल्याचं मत व्यक्त करत आहेत. यावर चाहत्यांचे संमिश्र प्रतिसाद येत आहेत. आता यावर रणवीरच उत्तर देऊन चाहत्यांच्या मनातील गोंधळ दूर करू शकतो.

https://twitter.com/Harsh1904MJ/status/1021724441317797889

https://twitter.com/Harsh1904MJ/status/1021728521150849024

अली जफर आणि रणवीरने २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘किल दिल’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. तर अली जफरने काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे.