अॅक्शन आणि थरारने परिपूर्ण असा सलमान खानचा बहुचर्चित चित्रपट ‘रेस ३’ उद्या (शुक्रवारी) प्रदर्शित होत आहे. अनिल कपूर, जॅकलिन फर्नांडिस, बॉबी देओल, डेझी शहा, साकिब सलीम अशी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट ‘रेस’चा तिसरा भाग आहे. रेमो डिसूझा दिग्दर्शित या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता असून ट्रेलरलही बराच चर्चेत होता. ईदच्या मुहूर्तावर ‘भाईजान’चा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तर जाणून घेऊयात ‘रेस ३’ पाहण्याची पाच कारणे..

१. अबू धाबी, बँकॉक, थायलंड, लेह लडाख अशा विविध ठिकाणी या चित्रपटाचं शूटिंग झालं. ३५ दिवसांच्या अबू धाबी इथल्या शूटिंगमध्ये चित्रपटातील महत्त्वाचे अॅक्शन सीन शूट करण्यात आले. प्रसिद्ध हॉलिवूड स्टंट कोऑर्डीनेटर टॉम स्ट्रूथर्सने हे अॅक्शन सीन कोरिओग्राफ केले आहेत. ‘द डार्क नाईट’, ‘द इन्सेप्शन’, ‘एक्स मेन- फर्स्ट क्लास’ यांसारख्या चित्रपटातील अॅक्शनसाठी टॉम ओळखला जातो.

https://www.instagram.com/p/Bj_zpHon8Ni/

२. तीन मिनिटांच्या ट्रेलरमध्येच चित्रपटातील अॅक्शन सीन्सचा अंदाज तुम्हाला आला असेल. यातल्या प्रत्येक कलाकाराने सर्व स्टंट्स स्वत:च केले आहेत. जॅकलिनने यासाठी मिक्स्ड मार्शल आर्ट्सचं प्रशिक्षण घेतलं आहे.

https://www.instagram.com/p/BiEyyaxH85V/

३. ‘रेस ३’ हा चित्रपट 2D आणि 3D मध्येही प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे कलाकारांच्या अॅक्शनचा थरार 3D पाहणं नक्कीच औत्सुक्याचं ठरणार आहे.

वाचा : अरमान कोहलीच्या गर्लफ्रेंडने तक्रार घेण्यामागचं खरं कारण माहितीये का?

४. चित्रपटात वेगवेगळ्या महागड्या गाड्यांचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये ६० सुपरकार्सचा समावेश आहे. फरारी, लॅम्बॉर्गिनी, अॅस्टन मार्टिन आणि मॅसराटी यांसारख्या महागड्या गाड्यांचा त्यात समावेश आहे. चित्रपटातील एक दृश्य फॉर्म्युला १ रेस ट्रॅकवर शूट करण्यात आला आहे.

५. चित्रपटातील सलमान खानची ग्रँड एण्ट्रीही चक्रावून टाकणारी असणार आहे. ‘लार्जर दॅन लाइफ’ अशा अॅक्शन सीनसह सलमानची एण्ट्री होणार असून ‘दबंग’ खानचा अनोखा अंदाज यात पाहायला मिळणार आहे.