वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय रिअॅलिटी शो म्हणजे बिग बॉस. या शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांच्या आयुष्यातील अनेक गुपितं प्रेक्षकांसमोर उघड होतात. बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वामधील एका स्पर्धकाचे गुपित आता सर्वांसमोर आले आहे. अभिनेता आस्ताद काळे याने बिग बॉसच्या घरात त्याची लव्हस्टोरी सर्वांसमोर सांगितली होती.
गेल्या काही वर्षांपासून आस्ताद काळे मराठी अभिनेत्री स्वप्नाली पाटीलसोबत रिलेशनशीपमध्ये आहे. आता हे दोघे लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. आस्तादने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याचे आणि स्वप्नालीचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आस्तादने काळ्या रंगाचा सूट परिधान केला आहे तर स्वप्नालीने निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. दोघे ही फोटोमध्ये रोमॅन्टिक अंदाजात दिसत आहेत. चाहत्यांनी त्यांच्या या फोटोवर कमेंट आणि लाईकचा वर्षाव केला आहे. हे फोटो त्यांच्या प्रीवेडिंगचे असल्याचे म्हटले जात आहे.
View this post on Instagram
Us…. #instagood #instaglam #instagram #couplegoals #photoshoot #marathiactors
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
आस्ताद आणि स्वप्नालीने ‘पुढचं पाऊल’ या मालिकेत एकत्र काम केले. या मालिकेदरम्यान त्या दोघांमध्ये मैत्री झाल्याचे म्हटले जात आहे. त्यानंतर आस्ताद स्वप्नालीच्या प्रेमात पडला. आस्तादने स्वप्नालीला अद्याप प्रपोज केलेले नाही असे म्हटले जात आहे.