मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमणने शनिवारी त्याचा ५२वा वाढदिवस साजरा केला. यादिवशी जगभरातील त्याच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. मिलिंद आणि त्याच्याहून कमी वयाची त्याची प्रेयसीची प्रेमकथा सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय असते. यामागचे कारण म्हणजे एकीकडे मिलिंद ५२ वर्षांचा आहे तर त्याची प्रेयसी अंकिता कोनवार फक्त १८ वर्षांची आहे. अंकितासोबत वाढदिवस साजरा करतानाचे काही फोटो त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
अंकितासोबतचा सेल्फी शेअर करत मिलिंदने शुभेच्छांसाठी तिचे आभार मानले. तर अंकितानेही या सेलिब्रेशनचे काही फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. ‘कारण, एक केक त्याच्यासाठी पुरेसा नाही,’ असे कॅप्शन देत तिने केकचेही फोटो पोस्ट केले आहेत.
वाचा : ‘साहो’च्या सेटवर मोबाईल फोन्सच्या वापरावर बंदी
‘मुंबई मिरर’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार अंकिता कोनवार ही एक एअर हॉस्टेस असून, हे दोघे गेल्यावर्षी ऑक्टोबरपासून एकमेकांना डेट करत आहेत. मिलिंदने त्याची प्रेम कहाणी सोशल मीडियावरही शेअर केली आहे. त्याचबरोबर अंकितासोबतचे अनेक फोटोदेखील त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.