अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्या साखरपुड्याची गेल्या काही दिवसांत बरीच चर्चा झाली. ऑनस्क्रीन केमिस्ट्रीसोबतच ऑफस्क्रीन केमिस्ट्रीमुळेही चर्चेत असणारी ही जोडी ५ जानेवारी म्हणजेच दीपिकाच्या वाढदिवसाला साखरपुडा करणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र, या केवळ अफवा असल्याचं स्पष्ट झालं. ‘स्पॉटबॉय ई’ या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार साखरपुड्याची जरी अफवा असली तरी रणवीर- दीपिकाच्या घरी दोघांच्या लग्नाच्या जोरदार चर्चा असल्याचं म्हटलं जात आहे.

दोन्ही कुटुंबियांकडून रणवीर- दीपिकाच्या लग्नासाठी संमती असल्याची माहिती समोर येत आहे. बॉलिवूडच्या ‘मस्तानी’ने यंदाचा वाढदिवस परदेशात रणवीर सिंगसोबत साजरा केला. या वाढदिवसाला रणवीरच्या आईवडिलांनी तिला अत्यंत महागडे गिफ्टसुद्धा दिल्याची माहिती ‘स्पॉटबॉय ई’ या वेबसाइटने दिली आहे. डायमंडचा सेट आणि फॅशन डिझायनर सब्यसाचीने डिझाइन केलेली साडी त्यांनी तिला भेट म्हणून दिली आहे.

https://www.instagram.com/p/BdfbhqBBWJo/

वाचा : ‘पॅडमॅन’ला टक्कर देण्यासाठी ‘पद्मावत’ सज्ज

चित्रपटांच्या निमित्ताने एकमेकांना ओळखू लागलेले रणवीर आणि दीपिका या दोघांनीही एकमेकांच्या कुटुंबियांची भेट घेतली असल्याचे म्हटले जात आहे. दीपिका आणि रणवीरच्या नात्याविषयी सर्वांनाच माहिती असली तरीही या दोघांनी कधीही आपल्या नात्याचा उघडपणे स्वीकार केलेला नाही. रिलेशनशिपविषयी कोणतेही प्रश्न विचारले असता त्या दोघांनीही मोठ्या कौशल्याने या प्रश्नाची उत्तरे देण्यात टाळाटाळ केल्याचे पाहायला मिळाले.