वादग्रस्त रिअॅलिटी शो ‘बिग बॉस ११’चा अंतिम सोहळा आता दोन आठवड्यांवर येऊन ठपला आहे. त्यामुळे येत्या दिवसांमध्ये बिग बॉसच्या घरात आणखी रंजक गोष्टी पाहायला मिळू शकतात. शिल्पा शिंदे, हिना खान आणि विकास गुप्ता यांचा चाहतावर्ग मोठा असल्यामुळे त्यांच्यापैकीच एक यंदाचा विजेता होईल असा तर्क लावला जात आहे. तर सामान्य नागरिकांमधून आलेला लव त्यागी आता प्रसिद्ध झाला असून तोसुद्धा विजेतेपदाचा दावेदार मानला जातोय. पण, या आठवड्यात ‘नॉमिनेशन टास्क’मध्ये नॉमिनेट झालेल्या चार स्पर्धकांची नावे आश्चर्यकारक आहेत. कारण, या स्पर्धकांना विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. या आठवड्यात बिग बॉसचे घर कोणता स्पर्धक सोडणार आणि कोण पुढे जाणार याविषयी आता तर्कवितर्क लावण्यास सुरुवात झाली आहे.

TOP 10 NEWS वाचा : सुयश-अक्षयाच्या साखरपुड्यापासून अरबाजच्या प्रेसयीपर्यंत सर्वकाही एका क्लिकवर

सध्याच्या वृत्तानुसार, विकास गुप्ता हा शो जिंकणार असल्याचे म्हटले जातेय. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेली स्पर्धक अर्शी खान हिने असा तर्क लावला आहे. तिने दिलेल्या मुलाखतीनंतर विकास गुप्ता जिंकल्याच्या वृत्ताला हवा मिळाली. दरम्यान, एका अज्ञात व्यक्तीने केलेल्या ट्विटनुसार शिल्पा स्पर्धेतून बाहेर पडणार असल्याचे समजते. त्या ट्विटमध्ये लिहिलंय की, ‘शिल्पाच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी. बिग बॉसने शिल्पाला घराबाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. कारण मुंबईच्या सट्टा बाजारात बिग बॉसच्या विजेतेपदासाठी शिल्पावर मोठी रक्कम लागली आहे. जर ती हरली तर कंपनीला बराच फायदा होईल, असे सट्ट्यात सहभागी असलेल्या एका व्यक्तीने म्हटले आहे.’ मात्र, या ट्विटबद्दल कलर्स वाहिनी आणि बिग बॉसच्या शोकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही. त्यामुळे जर हे ट्विट खरं ठरलं तर शिल्पाच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच वाईट बातमी असेल.

वाचा : तेजस्विनी पंडितची अमिताभ बच्चन यांच्यासाठी खास भेट

शिल्पा नॉमिनेट झाल्यापासून तिच्या चाहत्यांमध्ये अस्वस्थता पाहावयास मिळतेय. त्यामुळे यावेळच्या ‘विकएण्ड का वार’मध्ये काय होणार याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, यंदाच्या भागात राणी मुखर्जी तिच्या आगामी ‘हिचकी’ चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी बिग बॉसमध्ये जाणार असल्याचे समजते.

Story img Loader