सलमान खान आणि भाग्यश्रीचा ‘मैंने प्यार किया’ हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर प्रचंड गाजला. याच चित्रपटामुळे भाग्यश्रीला लोकप्रियता मिळाली. या चित्रपटाच्या पडद्यामागील गमतीशीर गोष्टींची बरीच चर्चा झाली. भाग्यश्री-सलमानच्या किसिंग सीन मागचं सत्य, तोकडे कपडे घालण्यास भाग्यश्रीने नकार देण्यामागचं कारण अशा बऱ्याच गोष्टी ऐकायला मिळाल्या. मात्र, हा चित्रपट पाहिल्यानंतर अभिनेत्री झीनत अमान यांनी त्यावेळी काय प्रतिक्रिया दिलेली हे तुम्हाला माहित आहे का?

वांद्रे इथल्या ‘हॉटेल सी रॉक’मध्ये सलमान त्यावेळी वर्कआऊट करायला जायचा. त्या ठिकाणी बरेच सेलिब्रिटी यायचे. त्यांमध्ये झीनत अमान यांचाही समावेश होता. ‘मैंने प्यार किया’ चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगसाठी सलमानने जवळच्या मित्र-मैत्रिणींना आणि जिममध्ये येणाऱ्या ओळखीच्या व्यक्तींनाही आमंत्रित केलं. झीनतसुद्धा स्क्रिनिंगला पोहोचल्या. मात्र, चित्रपट पाहिल्यानंतर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा सलमानने प्रयत्न केला, तेव्हा त्या म्हणाल्या की, ‘हे अत्यंत बालिश आहे. नायिकेच्या पायाला बाम लावताना तू डोळे बंद करतोस. किती हास्यास्पद आहे हे? गुडघ्याच्या वर बाम लावायचा असल्यास डोळे बंद करण्यामागचं कारण मी समजू शकते. पण घोट्याजवळ लावताना डोळे का बंद करायला सांगितले?’ हे ऐकून सलमानलाही हसू आलं.

PHOTOS : बॉलिवूडचे ‘ट्रॅजेडी किंग’ दिलीप कुमार यांनी असा साजरा केला वाढदिवस

या चित्रपटात भाग्यश्रीने किसिंग सीन देण्यास स्पष्ट नकार दिला होता. दिग्दर्शकाला पुढे काय करावे हे कळतच नव्हते. शेवटी यावर उपाय म्हणून त्यांनी दोघांमध्ये काचेचा दरवाजा उभा केला आणि ते दृश्य चित्रीत केले.