अभिनेता टायगर श्रॉफ आणि त्याची कथित गर्लफ्रेण्ड दिशा पटानी सध्या चर्चेत आले आहेत. लॉकडाउनच्या काळात वांद्रे इथं फिरणाऱ्या टायगर श्रॉफला मुंबई पोलिसांनी अडवलं होतं. त्यानंतर कोणतही महत्वाचं कारण नसताना लॉकडाउनचे नियम तोडल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी टायगर श्रॉफ विरोधात तक्रार दाखल केली. टायगर श्रॉफवर तक्रार दाखल झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर आता टायगरची आई आयशा श्रॉफ य़ांनी संत्पत प्रतिक्रिया दिली आहे.
सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भैयानीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. यात त्याने टायगर आणि दिशाला पोलिसांनी अडवल्याची माहिती दिली होती. शिवाय हे योग्य आहे कि अयोग्य असं विचारलं होतं. या पोस्टवर टायगर श्रॉफच्या आई आयशा श्रॉफ यांनी कमेंट करत नाराजी व्यक्त केली. ” तुमची तथ्य चुकीची आहेत. ते घरी जात होते आणि पोलिसांनी त्यांना थांबवून आधार कार्ड चेक केलं. अशा काळात फिरण्याची कुणाला हौस नाही. कृपया अशा गोष्टी बोलण्यापूर्वी त्यातील तथ्य जाणून घ्या.”
आणखी वाचा: ‘आत्महत्या की हत्या’; अभिनेत्री जिया खानच्या मृत्यूचं गूढ कायम
दरम्यान आयशा यांच्या कमेंटवर एक युजर म्हणाला, “घरी जात होते पण कुठुन ? मॅडम ते बाहेर होते हा मुख्य मुद्दा आहे. ते सेलिब्रेटी आहेत म्हणून काय झालं नियम सर्वांना सारखे आहेत” युजरच्या या प्रश्नावर देखील आयशा यांनी मुलाची बाजू घेत उत्तर दिलं आहे. “जीवनावश्यक गोष्टींसाठी बाहेर जाण्यास परवानगी आहे. लोकांना नावं ठेवण्याऐवजी कुणी फ्रंटलाइन तो वर्कर्सना मोफत पुरवतं असलेल्या जेवणाबद्दल का लिहित नाही. कारण तो स्वत: याबद्दल बोलत नाही. त्यामुळे काही माहित नसेल तर एखाद्याबद्दल काहीही बोलू नका. धन्यवाद.” असं उत्तर टायगर श्रॉफच्या आई आयशा श्रॉफ यांनी दिलंय.
In the ongoing ‘War’ against the virus, going ‘Malang’ on the streets of Bandra cost dearly to two actors who have been booked under sections 188, 34 IPC by
Bandra PStn . We request all Mumbaikars to avoid unnecessary ‘Heropanti’ which can compromise on safety against #COVID19— Mumbai Police (@MumbaiPolice) June 3, 2021
आणखी वाचा: “भयानक डान्सर आहे”, नव्या डान्स व्हिडीओमुळे ‘दिया और बाती’ फेम दीपिका सिंह पुन्हा ट्रोल
दरम्यान ही पोस्ट डिलीट करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी एक ट्विट करत टायगर श्रॉफने नियमांचं उल्लघन केल्याची माहिती दिली आहे. मुंबईत दुपारी दोन वाजल्यानंतर कुणालाही कारण नसताना बाहेर फिरण्याची परवानगी नाही. मात्र तरीही तो (टायगर श्रॉफ) लॉकडाउन असताना संध्याकाळपर्यंत वांद्रे परिसरात फिरताना आढळून आला. त्यामुळे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.