‘सुलतान’, ‘टायगर जिंदा है’, ‘मेरे ब्रदर की दुल्हन’ यांसारख्या चित्रपटांचा दिग्दर्शक अली अब्बास जफरने नुकतंच लग्न केलं. खासगी समारंभात अलीचा निकाह पार पडला असून त्याने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली. इन्स्टाग्रामवर अलीने पत्नीचा हात धरल्याचा फोटो पोस्ट केला आहे.
अली अब्बासच्या या फोटोवर इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. त्याच्यासोबत ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटात काम केलेली अभिनेत्री कतरिना कैफनेही दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. बॉलिवूडमध्ये पदार्पणासाठी सज्ज झालेली कतरिनाची बहीण इसाबेलनेसुद्धा कमेंट करत शुभेच्छा दिल्या. ‘भारत’ या चित्रपटात भूमिका साकारलेल्या कॉमेडियन सुनील ग्रोवरने शुभेच्छा दिल्या.
View this post on Instagram
अली अब्बास जफरच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तो लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. या नवीन प्रोजेक्टमध्ये सैफ अली खान, डिंपल कपाडिया, सुनील ग्रोवर आणि इतर कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असतील.