छोट्या पडद्यावरील टीना दत्ता ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. टीना तिच्या बोल्ड फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. टीना ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. मात्र, यावेळी टीनाने तिचा एक वेगळाच फोटो शेअर केला आहे. हे फोटो पाहून तिचे चाहते आश्चर्य चकीत झाले आहे.
टीनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिचे ३ फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये टीनाने पिवळ्या रंगाचा सलवार सूट परिधान केला आहे. या फोटोत टीना मासाळी बाजारात असल्याचे दिसत आहे. टीनाचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
View this post on Instagram
टीनाला अनेकांनी सोशल मीडियावर ट्रोल केले आहे. एक नेटकरी म्हणाला, ‘निष्पाप प्राण्यांची हत्या थांबवा !!’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘बोंबिल कसे दिले?’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘ही नवीन मालिका येत आहे का?’ आणखी एक नेटकरी म्हणाला, ‘मच्छी मार्केट,’ अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी टीनाला ट्रोल केलं आहे.
‘उतरण’ या लोकप्रिय मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. या मालिकेत टीनाने ‘इच्छा’ही भूमिका साकारली होती. यानंतर टीनाने ‘डायन’ सारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.