टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचणाऱ्या भालाफेकपटू नीरज चोप्राशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये नीरज रेडिओ जॉकी (आरजे) मलिष्काला मुलाखत देत आहे. यामध्ये मलिष्का आधी तिच्या काही मित्रांसोबत नाचताना दिसली आणि नंतर मुलाखतीदरम्यान तिने नीरजकडे ‘जादू की झप्पी’ मागितली.
ऑलिम्पिकचा ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्रा टोक्योहून परतल्यानंतर खूप व्यस्त आहे आणि सतत टीव्ही चॅनेल, रेडिओ आणि वर्तमानपत्रांना मुलाखती देत आहे. अॅथलेटिक्समध्ये देशासाठी पहिले सुवर्ण जिंकून नीरजने इतिहास रचला.
हेही वाचा – टेनिसप्रेमींना धक्का..! लाल मातीचा बादशाह राफेल नदालनं घेतला ‘मोठा’ निर्णय
नीरज ‘रेड एफएम’ या रेडिओ चॅनेलवर व्हिडिओ कॉलद्वारे सामील झाला. आरजे मलिष्काने प्रथम त्याच्यासाठी ‘उडे जब-जब जुल्फेन तेरी’ या गाण्यावर नृत्य केले आणि नंतर त्याला ‘जादू की झप्पी’ देण्यास सांगितले. मलिष्का म्हणाली, ”मला जाण्याआधी तुला एक ‘जादू की झप्पी’ द्यायची आहे.” यावर लाजलेल्या नीरजने मलिष्काला हसत ”तुला लांबूनच नमस्कार”, असे उत्तर दिले.
More Cringe from Malishka : I want to give you Jadoo ki Jhappi
Neeraj Chopra : Aapko Dur se hi NAMASTE pic.twitter.com/PWlTOj3q1Y
— Rosy (@rose_k01) August 20, 2021
Ladiesssss..Yes I got the hard hitting, deep answers too but..Take the first 4 secs before the cam moves to the zoom call to guess who we are dancing for 😉 #udejabjabzulfeinteri and then tell me I did it for all of us #gold #olympics #neerajchopra @RedFMIndia @RedFM_Mumbai pic.twitter.com/SnEJ99MK31
— Mumbai Ki Rani (@mymalishka) August 19, 2021
नीरजची सुवर्णकामगिरी
नीरजने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला. सुवर्णपदक जिंकल्यानंतर जेव्हा तो घरी परतला तेव्हा, त्याचे जोरदार स्वागत करण्यात आले. याशिवाय त्याच्यावर बक्षीस म्हणून कोट्यवधी रुपयांचा पाऊस पडला आहे. 100 पेक्षा जास्त वर्षांच्या इतिहासातील ट्रॅक अँड फील्डमधील हे भारताचे पहिले पदक आहे. पुरुषांच्या भालाफेकीच्या अंतिम फेरीत नीरजने ८७.५८मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह टोक्योमध्ये सुवर्ण जिंकले.