बॉलिवूड जगतामध्ये राज्य करणारा अभिनेता शाहरुख खानकडे आजच्या घडीला बंगला, विविध प्रकारच्या गाड्या अशी कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे. पण, दिल्लीहून आपले करिअर करण्यासाठी हा अभिनेता मुंबईत आला होता, तेव्हा त्याच्या खिशात निव्वळ ३०० रुपये होते आणि राहायला घरही नव्हते. आज हाच अभिनेता कोट्यवधी किंमत असलेल्या वांद्रे येथील ‘मन्नत’ बंगल्यात राहतो. शाहरुखप्रमाणेच त्याचा आलिशान ‘मन्नत’ बंगलाही प्रसिद्ध आहे. त्याचा हा बंगला आतून एखाद्या महालाप्रमाणेच सजावण्यात आला आहे.

१९९५ साली विकत घेतलेल्या बंगल्याला शाहरुखने ‘मन्नत’ हे नाव दिले. त्याकाळी त्याने १५ कोटींना घेतलेल्या या बंगल्याची आताची किंमत तुम्हाला तोंडात बोटं घालण्यास भाग पाडेल. आताच्या घडीला या बंगल्याची किंमत तब्बल २०० कोटी रुपये इतकी आहे. ६००० चौरस फुटांच्या या बंगल्यात बेडरूम, लिविंग एरिया, जीम, खासगी बार, लायब्ररी, मुलांसाठी प्लेरूम आहे. या बंगल्याचे इंटेरियर स्वतः शाहरुखची पत्नी गौरी खान हिने केलंय.

शाहरुखने १५ कोटींना घेतलेल्या ‘मन्नत’ची आताची किंमत माहितीये?

‘माझे ट्विटर अकाऊंट पुन्हा सुरु न केल्यास मी आत्महत्या करेन’

‘ऐश्वर्याविषयीचे तसे बोलणे ऐकून मला वाईट वाटायचे’

गुजरात निवडणुका झाल्यावर ‘पद्मावती’ प्रदर्शित करा, भाजपची मागणी

शाहरुखला पाहण्याची ‘मन्नत’ अनेकांना पडली महागात

…अन् तिच्या आठवणीने सुबोध भावेचे डोळे पाणावले

सोनम कपूरला झालाय हा गंभीर आजार

पिंजऱ्यातील पक्ष्यांचा फोटो पोस्ट करणाऱ्या तापसीची नेटकऱ्यांनी घेतली ‘शाळा’

सुहानाच्या ‘या’ टी-शर्टच्या किंमतीत येऊ शकतात वर्षभराचे कपडे

भारतीय वंशाच्या चंद्रिकाचे सूर जगभर चर्चेत

Story img Loader