चंदीगढ बलात्कार प्रकरणी अभिनेत्री भाजप खासदार किरण खेर यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. बलात्कार पीडितेला त्यांनी एक सल्लाही दिला. पण, हा सल्ला दिल्यामुळे त्यांच्यावर अनेकांचा रोष ओढावल्याचे पाहायला मिळत आहे. रिक्षात आधीपासूनच तीन व्यक्ती बसलेले असताना तिने त्यात जाणेच चुकीचे होते, असे त्या म्हणाल्या.

उत्तर भारतात छेडछाडीच्या घटना सर्रास घडतात, त्यातही बलात्कारांविषयी सांगावे तर, हल्लीतर घरांमध्येही ही दुष्कृत्ये होतात. सामूहिक बलात्काराकडेही गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पण, पीडित मुलीविषयी वक्तव्य करताना त्यांनी वेगळाच सल्ला दिला. ‘त्या मुलीनेच रिक्षात बसण्यापूर्वी ही काळजी घ्यायला हवी होती. कारण, त्यात आधीपासूनच तीन माणसं बसलेली होती. मी हे सर्व मुलींच्याच सुरक्षिततेसाठी सांगतेय. मुंबईत आम्ही कधी टॅक्सीने प्रवास करायचो, तेव्हाही आम्हाला सोडायला येणाऱ्या व्यक्तीला त्या वाहन चालकाचा दुरध्वनी क्रमांक, वाहन क्रमांक या गोष्टी लिहून द्यायचो. कारण, आम्हाला सुरक्षितताही तितकीच महत्त्वाची होती. मला वाटतंय की या सर्व गोष्टींच्या दृष्टीने आपण सर्वांनीच सतर्क राहणे गरजेचे आहे’, असे त्या म्हणाल्या.

त्या मुलीने काळजी घ्यायला हवी होती; बलात्काराबद्दल किरण खेर यांचे वादग्रस्त विधान

Padmavati row: ‘पद्मावती’ चित्रपट कवितेवर आधारित: भन्साळी

‘राज यांचे वैयक्तिक नुकसान नाही, पण मनसेचे एक मत गेले’

‘केवळ पुस्तकाच्या मुखपृष्ठावरून त्याचे परीक्षण करणे चुकीचे’

साक्षी तन्वरबद्दल हिनाने केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर भडकली गौहर खान

भाभीजी म्हणते, त्या केवळ अफवा

लग्नाच्या दोन दिवस आधीच पळून गेली होती शिल्पा शिंदे?

तडजोड करण्याच्या मागणीला अभिनेत्रीनं ‘असं’ दिलं उत्तर

…म्हणून रोझ जॅकचे प्राण वाचवू शकली नाही

तनुश्री आणि इशिता दत्तामध्ये दुरावा?