मराठी चित्रपटांना डावलणाऱ्या चित्रपटगृहांवर सरकार कारवाई का करत नाही, असा सवाल ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी विचारला आहे. येत्या २२ तारखेला अभिनेता सलमान खानचा ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट प्रदर्शित होणार असून त्याच दिवशी मराठीतही ‘देवा’ आणि ‘गच्ची’ हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. पण, या दोन्ही चित्रपटांना सलमानच्या चित्रपटाच्या तुलनेत मिळणाऱ्या प्राइम टाइम शोची संख्या कमी असल्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे. यामध्ये राजकीय संघटनांनी उडी घेतल्याने वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर नाना पाटेकर यांनी ट्विट करून आपले मत व्यक्त केले.
राज्य सरकारने मराठी चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी मल्टिप्लेक्सना नियम आखून दिले आहेत. मग चित्रपटगृहांचे मालक या नियमांचे पालन का करत नाहीत? सरकारही त्यांच्यावर योग्य ती कारवाई का करत नाही?, असे सवाल नाना पाटेकर यांनी उपस्थित केले. त्यामुळे आता सरकार याविषयी काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
मराठी चित्रपटांना डावलणाऱ्या चित्रपटगृहांवर सरकार कारवाई का करत नाही?- नाना पाटेकर
विराटच्या घरी अनुष्काचा गृहप्रवेश
…तर महाराष्ट्रात ‘यशराज’च्या चित्रपटांचे चित्रीकरण होऊ देणार नाही- अमेय खोपकर
जेनेलियाने रितेशला दिले हटके गिफ्ट
‘देवा’ला मारुन कुठलाच ‘टायगर’ जिवंत राहू शकणार नाही, नितेश राणेंची डरकाळी
सनी लिओनीच्या कार्यक्रमात सुरक्षा पुरवण्यास पोलिसांचा नकार, आयोजकांची न्यायालयात धाव
पाहा, सेलिब्रिटींच्या मुलांची शाळा
घरच्यांच्या विरोधात जाऊन सोहेल खाननं केलं होतं लग्न
मनसेची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही- संजय निरुपम
पाच मिनिटांत सिक्स पॅक कसे कमवाल? जान्हवी कपूरने दिल्या टिप्स