विराट कोहली आणि अनुष्का शर्मा लग्न करणार असल्याची चर्चा काल सकाळी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. येत्या ९ ते १२ डिसेंबर दरम्यान हे प्रेमीयुगूल विवाह बंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात होते. एवढेच काय तर इटलीमध्ये ते हिंदू पद्धतीने लग्न करत असल्याचीही वार्ता येत होती. या बातमीमुळे विराट आणि अनुष्काचे चाहते खूश होतात न होतात तोच त्यांच्या लग्नाची बातमी खोटी असल्याचे वृत्त काही वेळानंतर समोर आले.

अनुष्काच्या प्रवक्त्याने विराट आणि अनुष्का इटलीमध्ये लग्न करत नसल्याचे म्हटले. अनेक वृत्त वाहिन्यांवर या दोघांच्या लग्नाची तारीख समोर आल्यामुळेच त्यांना हे विधान देणे गरजेचे झाले. विराट आणि अनुष्का यांच्या परिवाराची इटलीची तिकीटं आधीच बूक झाली आहेत. जवळच्या मित्र-परिवारांच्या उपस्थितीत इटलीमध्ये ९, १०, ११ आणि १२ तारखेला हिंदू पद्धतीने हे दोघं विवाह बंधनात अडकणार आहेत. तीन ते चार दिवसांचा हा लग्न सोहळा कोणत्याही ग्रॅण्ड इव्हेंटपेक्षा कमी नसेल, अशाच चर्चा सर्वत्र होत्या. गेल्या चार वर्षांपासून हे दोघे एकमेकांना डेट करत होते. एका जाहिरातीनिमित्त या दोघांची ओळख झाली आणि ओळखीचे रुपांतर मैत्रीत व्हायला वेळ लागला नाही.

विराट- अनुष्काच्या लग्नाची बातमी खोटीच

माहेरची साडीच्या सिक्वेलसाठी ‘तीच’ जास्त योग्य- अलका कुबल

श्रीदेवीच्या ‘या’ गाजलेल्या चित्रपटाच्या रिमेकमध्ये आलिया मुख्य भूमिकेत

‘आमच्या काही चुका एकसारख्याच होत्या’, रवीना-शिल्पाचे एकमत?

…तेव्हा शाहिदला पाहताच करिनाने पाठ फिरवली

PHOTOS: ‘हेट स्टोरी’ फेम अभिनेत्री पाउली अडकली विवाहबंधनात

‘पद्मावती’ वादावर पंतप्रधान मोदी आणि स्मृती इराणी गप्प का?- शत्रुघ्न सिन्हा

‘त्या’ बहुप्रतिक्षित चित्रपटातून अक्षयचा काढता पाय?

शशी कपूर यांचा ‘तो’ शेवटचा फॅमिली फोटो

PHOTO : पुन्हा एकदा बोल्ड अंदाजात दिसली सुहाना