बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली लग्नबंधनात अडकणार का, याविषयी प्रश्नचिन्हं कायम असलं तरीही काही गोष्टींकडे नीट लक्ष दिले तर ‘विरुष्का’च्या लग्नाच्या चर्चांवर विश्वास ठेवायला हरकत नाही असेच म्हणावे लागेल. विराट आणि अनुष्का इटलीला रवाना झाले असून तिथेच त्यांचा विवाहसोहळा पार पडेल असे म्हटले जातेय. त्यासाठी अनुष्का आणि तिचे कुटुंबीय परदेशात रवाना झाल्याचे समजते. पण, त्यांच्यासोबत आणखी एक व्यक्तीसुद्धा इटलीच्या दिशेने रवाना झाल्याचे म्हटले जातेय.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनुष्काच्या कुटुंबियांसोबत एक भटजीसुद्धा इटलीला गेले आहेत. भटजी, सेलिब्रिटी फॅशन डिझायनर आणि कलाविश्वातील मित्रमंडळी या साऱ्यांची उपस्थिती पाहता आता ‘विरुष्का’चे शुभमंगल जवळपास नक्कीच असल्याची अनेकांना खात्री होऊ लागली आहे.
विराट- अनुष्काच्या वऱ्हाडासोबत भटजीही इटलीला रवाना?
सॅनिटरी नॅपकिनविषयी दियाने दिला महत्त्वाचा संदेश
बहुचर्चित प्रोजेक्टमधून आमिरचा काढता पाय?
स्वप्निल जोशी दुसऱ्यांदा झाला बाबा
Year End 2017 Special : २०१७ मध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेली वादग्रस्त प्रकरणे
‘ज्युरासिक पार्क : फॉलन किंगडम’ चा ट्रेलर प्रदर्शित