बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. फरहान सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. बऱ्याच वेळा फरहान त्याला ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर देताना दिसतो. यावेळी देखील असेच काही झाले आहे. एका नेटकऱ्याने फरहानची तुलना ही बेडकाच्या आवाजाशी करत म्हणाला, हजार बेडकांसारखा डरॉव डरॉव करतो. आता फरहानने त्याला सडेतोड उत्तर दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फरहानने नुकतीच अरबाज खानच्या ‘पिंच २’ या चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. त्याचा प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या शोमध्ये आलेल्या प्रत्येक कलाकाराला त्याला केलेल्या ट्रोल्सवर उत्तर द्यावे लागते. तर या प्रोमोत अरबाज त्या ट्रोलर्सच्या कमेंट्स वाचतो आणि फरहान त्यावर उत्तर देतो. त्यावेळी अरबाज त्याला सांगतो की एका नेटकऱ्याने ‘तुझ्या आवाजाची तुलना ही हजार डरॉव डरॉव करणाऱ्या बेडकांसोबत केली आहे.’ यावर हसत फरहान म्हणाला, ‘या प्रकारे मी समाजसेवा करण्याचा प्रयत्न करतो. लोकांनी घरी रहावे आणि माझी गाणी ऐकावी अशी माझी इच्छा आहे. मला याची कल्पना आहे की माझा आवाज हा एका प्लेबॅक गायकासारखा नाही. प्लेबॅक गायण्यासाठी आपल्या आवाजात एक दर्जा असणं महत्त्वाचं असतं. माझा आवाज किंवा माझे कौशल्या त्याच्या जवळपास नाही. त्यामुळे मी दुसऱ्यासाठी गात नाही. मला त्याचा पूर्णपणे आनंद आहे आणि मी या बद्दल माफी मागणार नाही.’

आणखी वाचा : …म्हणून सिद्धार्थची आई घेते शेहनाजची काळजी

आणखी वाचा : ‘याला म्हणतात संस्कार’, बिग बींची नात आराध्याचा डान्सनंतर भजन गातानाचा व्हिडीओ झाला व्हायरल

फरहानने चित्रपट निर्माता म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. शाहरूख खानच्या ‘दिल चाहता है’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनातून फरहानला एक ओळख मिळाली. ‘रॉक ऑन’ या चित्रपटातून फरहानने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. ‘भाग मिल्खा भाग’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’, ‘दिल धडकने दो’ आणि ‘द स्काय इज पिंक’ यांसारख्या चित्रपटात फरहानने काम केले आहे. तर फरहानचा ‘तूफान’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Troll compared farhan akhtar to thousand croaking frogs his reply dcp