हिंदी चित्रपटसृष्टीतील बऱ्याच कलाकारांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांनाही उत्सुकता लागून राहिलेली असते. अशाच कलाकारांच्या यादीतील एक नाव म्हणजे सलमान खान. तसं पाहिलं तर सलमानच्या खासगी आयुष्याविषयी बरीच माहिती आतापर्यंत सर्वांसमोर आली आहे. पण, तुम्हाला माहितीये का, या दबंग अभिनेत्याचं लग्न होता होता राहिलं आहे. बॉलिवूडमध्ये सध्याच्या घडीला मोस्ट एलिजिबल बॅचलर सलमान त्याच्या प्रेमप्रकरणांमुळेही चर्चेत असतो.

बऱ्याच वर्षांपूर्वीची त्याची अशीच एक मुलाखत व्हायरल झाली होती. ज्यामध्ये त्याने लग्नाविषयीचा बेत सांगितला होता. सलमानच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत त्याला ज्यावेळी भावी आयुष्याविषयीचे काही प्रश्न विचारण्यात आले त्यावर तो म्हणाला, ‘हो, मी लग्न करण्याचा बेत आखतोय. ती संगीता बिजलानी असू शकते किंवा आणखी कोणी.’ संगीता बिजलानी आणि सलमानचं नातं म्हणजे चित्रपटसृष्टीतील बहुचर्चित प्रेमप्रकरण. इतकच काय तर, संगीतासोबत सलमानच्या लग्नाची तारीखही पक्की झाली होती. ‘इंडिया डॉट कॉम’ने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार संगीता- सलमान २७ मे १९९४ ला लग्न करणार होते. पण, सर्व काही सुरळीत सुरु असताना अचानक हे सर्व रद्द झालं. लग्नाची सर्व तयारी अर्ध्यावर आली असताना एकाएकी संगीताने सलमानवर नाराजी व्यक्त करत त्याच्यासोबतचं नातं संपवत ठरलेलं लग्न मोडलं.

वाचा : Tubelight Review : …अखेर ‘ट्युबलाइट’ पेटली रेssss!

salmankhan

असं म्हटलं जातं की, सोमी अलीसोबत सलमानची वाढती जवळीक यामागचं मुख्य कारण होतं. सलमानसोबतच्या नात्यानंतर संगीता क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीनच्या प्रेमात पडली आणि त्यानंतर त्या दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. सध्याच्या घडीला संगीता- सलमानमध्ये फार चांगली मैत्री असून त्याच्या विविध कौटुंबिक कार्यक्रमांनाही ती हजेरी लावते. ते दोघंही सध्या आयुष्यात बरेच पुढे आले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून सलमानचं नावही लुलिया वंतूरसोबत जोडलं जात आहे. तेव्हा आता बॉलिवूडचा हा मोस्ट एलिजिबल बॅचलर लग्नाच्या बेडीत केव्हा अडकतो हा प्रश्न अनुत्तरितच राहिला आहे असं म्हणायला हरकत नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाचा : आपल्यापेक्षा वयाने मोठ्या अभिनेत्रीला डेट करतोय हा स्टार किड