सलमान खान एक असा अभिनेता आहे ज्याच्या मनात कधी काय येईल हे सांगता येणं तसं कठीणच. त्याच्या मनात येतं तेव्हा हा अभिनेता सायकल चालवायला निघतो, कधी कधी तर तो रिक्षानेही प्रवास करतो. अशीच एक घटना काही दिवसांपूर्वी घडली. सलमान वांद्र्यातील मेहबूब स्टुडिओमध्ये सलमान त्याचा आगामी सिनेमा ‘ट्युबलाइट’च्या प्रमोशनसाठी गेला होता. त्यावेळी त्याने घरी परतण्यासाठी महागड्या गाडीचा पर्याय दूर सारत चक्क रिक्षाने जाण्यास प्राधान्य दिलं होतं. मुख्य म्हणजे दबंग खान ज्या रिक्षातून घरी गेला त्या रिक्षा चालकाला त्याने भाडं म्हणून दिलेली रक्कम पाहून अनेकांना धक्काच बसत आहे.

फक्त ५० रुपयांच्या भाड्याऐवजी सलमानने त्या रिक्षा चालकाला १००० रुपये देऊ केल्याची माहिती मिळाली आहे. तसं पाहिलं तर मेहबूब स्टुडिओ आणि सलमानचं घर यांत फारसं अंतर नाहीये. त्यामुळे फार फार तर याकरता ५० रुपये खर्च होऊ शकतात. पण, या कृतीतून भाईजानचा दिलदारपणा पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. गरजूंना मदत करण्यासाठी सलमान नेहमीच पुढे असतो. त्याच्या याच स्वभावामुळे भाईजान अनेकांच्या मनात घर करुन आहे.

दरम्यान, सलमान खानने पहिल्यांदाच रिक्षातून प्रवास केला असं नाहीये. याआधीही त्याने अनेकवेळा रिक्षातून प्रवास केला. यानंतर द्रुतगती मार्गावरून सायकल चालवतानाही तो दिसला. त्याने त्याचा सायकलवरचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्याने ‘बिइंग ह्युमन’ य संस्थेअंतर्गत लाँच केलेल्या ई-सायकलवरून सैर केली. सायकलस्वारी सलमानच्या आवडत्या गोष्टींपैकी एक आहे असं म्हणायला हरकत नाही. वांद्रे परिसरात अनेकदा रात्री उशीरा हा अभिनेता सायकल चालवण्यासाठी बाहेर पडतो. त्यामुळे त्या परिसरात फिरताना दबंग खान तुम्हाला दिसला तर आश्चर्यचकित होण्याचं कारण नाही.

वाचा : पोरगी पास होण्याचं सुख काय असतं ते भाऊ कदमला विचारा

salman-in-auto

salman-khan-auto-ride-1

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्याच्या घडीला सलमान ‘ट्युबलाइट’च्या प्रसिद्धीमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात सोहेल खान, चिनी अभिनेत्री झू झू, दिवंगत ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी झळकणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने सलमान आणि सोहेल हे रिअल लाइफ खान बंधू सात वर्षांनंतर स्क्रीन शेअर करणार आहेत. त्यांमुळे ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणारा हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची प्रचंड गर्दी होणार असं म्हटलं जात आहे.